खुलासा संस्थेच्या शाळेतील शिपायाची शालार्थ आयडी नियमाप्रमाणेच …. -संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ
![]()
खुलासा
संस्थेच्या शाळेतील शिपायाची शालार्थ आयडी नियमाप्रमाणेच ….
-संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ
जळगांव प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगाव जिल्ह्यातील अनियमित शालार्थ आयडी शिक्षक/शिक्षकेतर यादीत ५६० क्रमांकावर आमच्या कळमसरे विद्या प्रसारक संस्थेचे व शारदा माध्यामिक विद्यालय कळमसरे ता. अमळनेर जि. जळगाव शाळेचे आणि अनुकंपा तत्वावर नियुक्त शिपाई श्री गणेश सुभाष पाटील याचे नाव समाविष्ठ आहे. याबाबतीत आज पावेतो संस्थेकडे कुठलीही विचारणा झालेली नाही.
सविस्तर असे की, श्री गणेश सुभाष पाटील यांचे वडील कै. श्री सुभाष एकनाथ पाटील आमच्या संस्थेच्या किनोद ता. जि.जळगाव या शाळेत शिपाई पदी कार्यरत असतांना त्यांचे निधन झाले होते. त्यांचा अनुकंपा तत्वावर वारस श्री गणेश सुभाष पाटील याची संस्थेच्या अनुदानित शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे ता. अमळनेर जि. जळगाव या शाळेत दि. १५/०६/२०२४ पासून शिपाई पदी नियमाप्रमाणे नेमणूक केलेली आहे. मान. शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.जळगाव यांनी या अनुकंपा तत्वावर नेमणुकीस जा. न.३२३८/२०२४ दि. १४/१०/२०२४ अन्वये दि.१५/०६/२०२४ ते १४/०६/२०२७ तीन वर्षासाठी शिपाई सेवक पदी वैयक्तिक मान्यता दिलेली आहे.
मान. शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प. जळगाव यांनी शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ठ होणेसाठी मान. शिक्षण उपसंचालक सो नाशिक यांचे कडेस रीतसर प्रस्ताव सादर केल्यानंतर मान. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जा. न. ९११९/९१२० दि.३०/१०/२०२४ अन्वये श्री गणेश सुभाष पाटील याचे शिपाई पदी शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ठ केलेले आहे. सर्व प्रकारच्या कार्यवाहीची संपूर्ण कागदपत्रे संस्थेने जपून ठेवलेली आहेत.
नेमणुक पासून शालार्थ आयडी पर्यंतची मान्यता प्रक्रिया पारदर्शक व नियमाप्रमाणे झालेली आहे. आमच्या संस्थेच्या ५० वर्षाच्या इतिहासात कुठलेही अवैध भरती अथवा कुठलेही अनियमित, बोगस काम झालेले नाही. असे असतांना जिल्ह्याच्या अनियमित शालार्थ आयडी यादीत आमच्या संस्थेचे नाव असल्याने हा आमच्या प्रतिमेस मोठा धक्का आहे. एक प्रकारे संस्थेची बदनामी आहे. यासंदर्भात संस्थेने मान. शिक्षणमंत्री, मान. शिक्षण आयुक्त, मान. शिक्षण उपसंचालक यांना पत्राद्वारे वरील प्रमाणे कळविले आहे.

