वेदनेच्या ‘काळ्या-निळ्या रेषां’तून उभे राहिले जीवनचित्र; राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी सन्मान
1 min read

वेदनेच्या ‘काळ्या-निळ्या रेषां’तून उभे राहिले जीवनचित्र; राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी सन्मान

Loading

वेदनेच्या ‘काळ्या-निळ्या रेषां’तून उभे राहिले जीवनचित्र; राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी सन्मान

अमळनेर प्रतिनिधी- व्यवस्थेचे घाव पाठीवर काळ्या निळ्या रंगाची आकृती काढून नामानिराळे जरी राहिले तरी काळजावर कायमचे कोरले जातात. गावकुसाबाहेर राहून सोसलेल्या प्रसंगांना कामी आलेली माणसे मात्र कायमची मनात घर करुन राहतात. अश्या वेळी काळ्या निळ्या रेषा रेखाटताना सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. अशी भावना निवृत्त कलाशिक्षक राजू बाविस्कर यांनी व्यक्त केले. राज्य शासनाने निवृत्त कलाशिक्षक राजू बाविस्कर यांच्या “काळ्या निळ्या रेषा” या साहित्यकृतीस “साहित्य अकादमी पुरस्कार” जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर खान्देश साहित्य संघाच्यावतीने त्यांचा सहपत्नी विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी खान्देश साहित्य संघ, महाराष्ट्र चे केंद्रीय अध्यक्ष तथा प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी, खान्देश साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष तथा गझलकार शरद धनगर, खान्देश साहित्य संघाचे जिल्हा सचिव तथा ‘दै. सकाळ’चे तालुका बातमीदार उमेश काटे, जिल्हा उपाध्यक्ष रजनी पाटील, महिला संघटक रेखा मराठे-पाटील आदी उपस्थित होते. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. श्री बाविस्कर यांनी आपल्या आत्मकथनातून शब्दातून जिवंत चित्र उभे केले आहे. वेदना देणाऱ्यापेक्षा वेदनेवर फुंकर घालणारे माझ्या स्मरणात आहे. आपल्या मनात वाईट आठवणींना थारा ना देता चांगल्या आठवणी मनात ठेवण्याचा अनमोल संदेश ही त्यांनी दिला. त्यांनी लासूर (ता चोपडा) या आपल्या मूळ गावी असलेल्या अनेक आठवणी सांगितल्या. संततधार पावसात आमच्या झोपड्या पूर्णपणे उध्वस्त झाल्या होत्या. सर्वत्र पाणी असल्यामुळे घराला झिर फुटला होता त्यामुळे रात्री मुला बाळासह अबाल वृद्धाना झोपताही येत नव्हते, अश्या प्रतिकूल परिस्थितीत काहींनी गावाचे श्रीराम मंदिर आमच्यासाठी खुले करून दिले. त्या मंदिरात दिलेला आठ ते दहा दिवसाचा आसरा आजही हृदयाच्या कोपऱ्यात घर कोरून माणुसकी ची शिकवण देणारा आहे. लोक वर्गणी च्या माध्यमातून उभारलेला शिवरायांचा पुतळ्या पासून ते पाटील वाड्यात घडलेल्या सकारात्मक घटना सांगताना ते पूर्णपणे तल्लीन झाले होते. श्री बाविस्कर यांच्या पहिल्याच साहित्य कृतीला मिळालेल्या “साहित्य अकादमी पुरस्कारात त्यांच्या धर्मपत्नी भारतीताई बाविस्कर यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *