समाजभूषण पुरस्काराने डॉ. दादासाहेब संजय सोनवणे यांचा गौरव  शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल
1 min read

समाजभूषण पुरस्काराने डॉ. दादासाहेब संजय सोनवणे यांचा गौरव शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल

Loading

समाजभूषण पुरस्काराने डॉ. दादासाहेब संजय सोनवणे यांचा गौरव

शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल

अमळनेर प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्यपूर्ण व प्रभावी कार्य करत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे भरवस माध्यमिक विद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. दादासाहेब संजय सोनवणे यांना नुकताच प्रतिष्ठेचा “समाजभूषण पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या समर्पणाची जाणीव करून देणारा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
हा मानाचा पुरस्कार नैसर्गिक मानवअधिकार सुरक्षा परिषद फोरम, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा-२०२६ मध्ये प्रदान करण्यात आला. समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो, त्यामुळे या सन्मानाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.
डॉ.प्रा सोनवणे यांनी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले उल्लेखनीय कार्य, सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी तसेच राजकीय क्षेत्रात दाखवलेले सक्षम नेतृत्व या सर्व बाबींची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या कार्यातून समाजसेवेचा नितांत भाव आणि दूरदृष्टी स्पष्टपणे जाणवते.
या भव्य सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये आमदार मंजुळाताई गावित, डीवायएसपी वासुदेव देसले, संचालिका व माजी सरपंच सुषमाताई देसले पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे, महिला अध्यक्षा प्रा. मंदाकिनी भामरे, लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, मुख्याध्यापक प्रदीप गहिवरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल पाटील, जॉईंट सेक्रेटरी ईश्वर पाटील, जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. ज्योती लष्करी, तसेच योगेश भदाणे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शाल व सन्मानपत्र देऊन विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला.
या सन्मानामुळे डॉ.प्रा सोनवणे यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून, त्यांच्या मित्रपरिवार, सहकारी व समाजातील विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. प्रा.दादासाहेब संजय सोनवणे यांना मिळालेल्या या प्रतिष्ठित गौरवाबद्दल सर्व स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळत राहो, हीच अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *