लोंढवे येथे जायन्ट्स ग्रुपकडून मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी,  १७१ रुग्णांची तपासणी; २४ रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी नंदुरबारला पाठविणार
1 min read

लोंढवे येथे जायन्ट्स ग्रुपकडून मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी, १७१ रुग्णांची तपासणी; २४ रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी नंदुरबारला पाठविणार

Loading

लोंढवे येथे जायन्ट्स ग्रुपकडून मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी,

१७१ रुग्णांची तपासणी; २४ रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी नंदुरबारला पाठविणार

अमळनेर (प्रतिनिधी) :
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांच्या विद्यमाने व कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय, नंदुरबार यांच्या सौजन्याने लोंढवे येथे आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे संपन्न झाले.

जायन्ट्स ग्रुप अमळनेर हे सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण व आरोग्य क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, अल्पावधीतच संस्थेने अमळनेर तालुक्यात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्याच सामाजिक बांधिलकीतून आयोजित या शिबिराचा लोंढवे व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

या शिबिरात एकूण १७१ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी २४ रुग्णांची निवड करून त्यांना दि. २७ मार्च रोजी नंदुरबार येथे मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे. निवड झालेल्या रुग्णांना राहण्याची, जेवणाची, प्रवासाची तसेच शस्त्रक्रियेची संपूर्ण सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. महेश रमण पाटील यांनी “असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी” या उक्तीप्रमाणे नेत्रदोष असलेल्या रुग्णांसाठी असेच उपक्रम पुढेही राबविण्याचा मानस व्यक्त केला. नागरिकांचे सहकार्यच आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी युनिट ऑफिसर डॉ. सुनील पाटील, प्रोग्राम ऑफिसर व अध्यक्ष डॉ. महेश पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, राजेंद्र भावसार, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. पी.आर. भावसार, प्रा. चंदुलाल बडगुजर, सदस्य महेश पाटील, संजय मुंडके, प्रदीप शिंगाणे आदींसह स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

तसेच लोंढवे गावच्या सरपंच सौ. भारती अशोक पाटील, बाळासाहेब जीवन पाटील, अशोक शालीग्राम पाटील, बन्सीलाल आसाराम भागवत, दिलीप गोरख पाटील, नारायण अभिमन भिल, चतुर नवल पाटील, नाना पवार, कैलास खैरनार, देविदास पाटील, अर्जुन भागवत, गंगाराम पाटील, भगवान पाटील आदी ग्रामस्थांची उपस्थिती लाभली व त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव संदीप महाजन यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *