अखिल भारतीय डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेची “सकारात्मक प्रशासन” मोहिम सुरू , प्रशासन-पत्रकार संवादातून पुण्याची सकारात्मक प्रतिमा उभारण्याचा उपक्रम
1 min read

अखिल भारतीय डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेची “सकारात्मक प्रशासन” मोहिम सुरू , प्रशासन-पत्रकार संवादातून पुण्याची सकारात्मक प्रतिमा उभारण्याचा उपक्रम

Loading

अखिल भारतीय डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेची “सकारात्मक प्रशासन” मोहिम सुरू

प्रशासन-पत्रकार संवादातून पुण्याची सकारात्मक प्रतिमा उभारण्याचा उपक्रम

पुणे : अखिल भारतीय डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मा. राजा माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय उपाध्यक्ष मा. ॲड. अमोल पाटील यांच्या संकल्पनेतून “सकारात्मक प्रशासन” ही विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. प्रशासन आणि पत्रकार यांच्यात सकारात्मक संवाद निर्माण करून प्रशासनाच्या चांगल्या व विधायक कामांची माहिती समाजापर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

या मोहिमेची सुरुवात “सकारात्मक पुणे” या उपक्रमातून करण्यात आली. अलीकडील काळात ड्रग्स, गुन्हेगारी तसेच इतर विविध कारणांमुळे पुण्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नकारात्मक प्रतिमा तयार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुण्याची सामाजिक व सांस्कृतिक प्रतिमा मलिन होत असून त्याचा थेट परिणाम शहराच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीवर होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्याची सकारात्मक प्रतिमा समाजासमोर मांडण्यासाठी तसेच नाच्या चांगल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या अंतर्गत आज हडपसर पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले साहेब, पुणे महानगरपालिका ह विभाग उपायुक्त मा. रवि खंदारे साहेब तसेच काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. मानसिंग पाटील साहेब यांची भेट घेण्यात आली.

या उपक्रमाचे पोलीस प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले असून या मोहिमेला विशेष सहकार्य करण्याची तयारीही व्यक्त करण्यात आली.

यावेळी केंद्रीय उपाध्यक्ष मा. ॲड. अमोल पाटील, नूतन शहराध्यक्ष मा. विजय रणदिवे, शहराध्यक्ष मा. महेश टेळे पाटील, सरचिटणीस मा. मुकेश वाडकर तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *