मितभाषी पण कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण यांना “महिला प्रेरणा सन्मान”
![]()
मितभाषी पण कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण यांना “महिला प्रेरणा सन्मान”
जळगांव प्रतिनिधी :
जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) मध्ये आपल्या कार्यतत्परतेने, प्रामाणिकपणाने व शांत, मितभाषी स्वभावाने विशेष ओळख निर्माण करणाऱ्या उपशिक्षणाधिकारी ताईसाहेब मा. रागिणी चव्हाण मॅडम यांना मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते “महिला प्रेरणा सन्मान” देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रागिणी चव्हाण मॅडम या संचालक (ग.स.) म्हणूनही आपल्या जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत असून, शिक्षण क्षेत्राच्या गुणवत्तावाढीसाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शिक्षकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत शिस्त व गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
त्यांचा मितभाषी स्वभाव, सकारात्मक दृष्टिकोन आणि कामातील काटेकोरपणा यामुळे शिक्षक, अधिकारी व कर्मचारी वर्गात त्यांना विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. आपल्या कर्तव्यनिष्ठ वृत्तीमुळे त्यांनी अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत “महिला प्रेरणा सन्मान” प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रातील अनेकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण मॅडम यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याची पावती असून, पुढील काळातही त्या शिक्षण क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
— ईश्वर आर. महाजन, पत्रकार, अमळनेर ✍️📚🏆

