प्रामाणिकपणाचा आदर्श : एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशाची हरवलेली बॅग सुरक्षित परत ,  अमळनेर–धुळे मार्गावरील बसमध्ये विसरलेली बॅग रोख रक्कम व महत्वाच्या कागदपत्रांसह मिळाली; चालक-वाहकांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक
1 min read

प्रामाणिकपणाचा आदर्श : एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशाची हरवलेली बॅग सुरक्षित परत , अमळनेर–धुळे मार्गावरील बसमध्ये विसरलेली बॅग रोख रक्कम व महत्वाच्या कागदपत्रांसह मिळाली; चालक-वाहकांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक

Loading

प्रामाणिकपणाचा आदर्श : एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशाची हरवलेली बॅग सुरक्षित परत केली

अमळनेर–धुळे मार्गावरील बसमध्ये विसरलेली बॅग रोख रक्कम व महत्वाच्या कागदपत्रांसह मिळाली; चालक-वाहकांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक

अमळनेर प्रतिनिधी :
सार्वजनिक सेवेतील प्रामाणिकपणा आणि जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण अमळनेर–धुळे मार्गावरील एसटी कर्मचाऱ्यांनी घालून दिले आहे. प्रवाशाची बसमध्ये विसरलेली बॅग रोख रक्कम व महत्वाच्या कागदपत्रांसह सुरक्षितपणे परत करून त्यांनी सेवाभावाची जाणीव पुन्हा अधोरेखित केली.
आज दिनांक ११ मार्च २०२६ (बुधवार) रोजी सायंकाळी सुमारे ४:४५ वाजता अमळनेर ते धुळे या एसटी बसमध्ये प्रवास करत असताना शिवम् मानकर (रा. धुळे, मूळचे अमरावती) हे घाईगडबडीत आपली बॅग बसमध्येच विसरून उतरले. त्या बॅगेमध्ये सुमारे २५०० रुपये रोख रक्कम तसेच महत्वाची कागदपत्रे होती.
दरम्यान, सदर प्रवासी धुळे येथे वाहतूक नियंत्रक कक्षात चौकशीसाठी गेले असता संबंधित बस पुढे धुळे–जळगाव मार्गाने निघून गेल्याचे समजले. अशावेळी धुळे आगाराचे चालक महेंद्र सनेर यांनी प्रवाशाची विचारपूस करून तात्काळ मदतीसाठी प्रयत्न सुरू केले.
त्यांनी लगेच अमळनेर आगाराचे वाहक नितिन बागले यांच्याशी संपर्क साधला. नितिन बागले यांनी संबंधित बसचे वाहक बापू चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता प्रवाशाने दिलेल्या वर्णनानुसार ती बॅग बसमध्ये सापडली. बापू चौधरी यांनी ती बॅग रोख रक्कम व महत्वाच्या कागदपत्रांसह सुरक्षितपणे स्वतःच्या ताब्यात घेतली.
यानंतर प्रवासी शिवम् मानकर यांनी आपल्या घरी जवळील मित्राला फोन करून माहिती दिली. त्या मित्राने पारोळा बस स्थानकात जाऊन सदर बॅग रोख रक्कम व सर्व कागदपत्रांसह ताब्यात घेतली.
या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा, तत्परता आणि सेवाभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
चालक महेंद्र सनेर, वाहक नितिन बागले आणि बापू चौधरी यांनी दाखवलेली जबाबदारी व प्रामाणिक सेवा निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *