कळमसरे येथील योगराज (आबा) जगन्नाथ चौधरी यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ , अल्पशा आजाराने निधन; उद्या सकाळी ९ वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा
![]()
कळमसरे येथील योगराज (आबा) जगन्नाथ चौधरी यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ
अल्पशा आजाराने निधन; उद्या सकाळी ९ वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा
अमळनेर प्रतिनिधी :
कळमसरे तालुका अमळनेर येथील कळमसरे गावचे रहिवासी कै. योगराज (आबा) जगन्नाथ चौधरी (56)यांचे आज दिनांक ११ मार्च २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे कळमसरे परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
कै. योगराज (आबा) चौधरी हे स्वभावाने मनमिळाऊ, शांत आणि सर्वांशी प्रेमाने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. गावातील सामाजिक व कौटुंबिक कार्यात ते नेहमी सक्रिय राहून लोकांमध्ये आपुलकीचे नाते जपणारे होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा मोठा परिवार आहे. धनराज जगन्नाथ चौधरी यांचे ते लहान बंधू होते
त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता कळमसरे येथून निघणार असून सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप द्यावा, असे आवाहन कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
शोकाकुल :
श्री. धनराज जगन्नाथ चौधरी
श्री. राजेंद्र रघुनाथ चौधरी
श्री. अशोक एकनाथ चौधरी
श्री. मनीष योगराज चौधरी
श्री. विनय योगराज चौधरी
तसेच समस्त करनकाळ परिवार
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. 🕯️🙏

