क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त धुळ्यात अभिवादन ,अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने प्रतिमेला पुष्पहार अर्पण; सामाजिक कार्याचा संकल्प
![]()
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त धुळ्यात अभिवादन
अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने प्रतिमेला पुष्पहार अर्पण; सामाजिक कार्याचा संकल्प
अमळनेर प्रतिनिधी :
भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रीशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज दिनांक १० मार्च २०२६ रोजी धुळे येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विलासरावजी पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, स्त्रीशिक्षणाचा पाया घालून समाज परिवर्तनाची ज्योत त्यांनी प्रज्वलित केली. त्यांच्या कार्यामुळे आज महिलांना शिक्षण, स्वाभिमान आणि समानतेचा मार्ग खुला झाला आहे.
यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे धुळे महानगर अध्यक्ष श्री. हरिश्चंद्र रेंडे माळी, कार्याध्यक्ष श्री. राजेंद्र तुकाराम गवळे तसेच कार्यकर्ते श्री. अरुण बिरारी माळी यांनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, स्त्रीसक्षमीकरण आणि सामाजिक समतेच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा आदर्श समाजात पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याची आठवण करून देत समाजात शिक्षण व समतेचा संदेश पोहोचविण्यात आला. .

