देशभरातील पंचायतींच्या महिला प्रतिनिधीची दिनांक 11 रोजी दिल्लीत राष्ट्रीय परिषद पंचायत राज विभागाकडून खान्देशातील फागणे व चिमणपुरीपिंपळेच्या सरपंच दिल्ली रवाना
![]()
देशभरातील पंचायतींच्या महिला प्रतिनिधीची दिनांक 11 रोजी दिल्लीत राष्ट्रीय परिषद
पंचायत राज विभागाकडून खान्देशातील फागणे व चिमणपुरीपिंपळेच्या सरपंच दिल्ली रवाना
ग्रामपंचायत स्तरावर पंचायत राज अभियानातून लोकांना सामावून घेत जनतेचा सहभाग वाढवून घेऊन लोकोपयोगी व सर्व समावेश उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील 26 महिला सरपंचांना दिल्लीत डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात दिनांक 11 मार्च रोजी होणाऱ्या पंचायतराजच्या राष्ट्रीय परिषदेसाठी नॉमिनेशन प्राप्त निवड प्रक्रियेतुन निवडण्यात आले त्यात चिमणपुरीपिंपळेच्या लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी महिला बचतगट सक्षमीकरण करणे, वेळोवेळी महिला आरोग्य तपासणी करुन घेणे, महिलांचा ग्रामसभेत सहभाग वाढविणे, आदर्श महिला स्नेही संकल्पनेवर कामकाज, बालविवाह मुक्तीकरीता विविध कार्यक्रम आयोजीत करून बालमृत्यू टाळण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले शासनाच्या विविध योजनांचा लाभमहिलांना मिळवून देण्यासाठी कॅम्प आयोजीत करण्यात आले म्हणूनपंचायत त्रिस्तरातून जळगाव जिल्यातून एकमेव महिला सरपंच म्हणून दिल्लीत दिनांक 11 मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात होणाऱ्या पंचायतराज राष्ट्रीय परिषदेत निमंत्रित करण्यात आले असून खान्देशातून दोन महिला सरपंच दिनांक 9 रोजी रात्री दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत त्यात धुळे जिल्ह्यातील फागणे येथील महिला सरपंच विद्याबाई नगराज पाटील यांची ही निवड होऊन त्याही दिल्लीसाठी सोबतच रवाना झाल्या आहेत

