साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये संदीप घोरपडे यांचा ‘आदर्श लोकनेता’ पुरस्कारानिमित्त सत्कार; विलास चौधरी सरांचा ५८ वा वाढदिवस उत्साहात साजरा , सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन; शिक्षक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रेरणादायी सत्कार सोहळा
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये संदीप घोरपडे यांचा ‘आदर्श लोकनेता’ पुरस्कारानिमित्त सत्कार; विलास चौधरी सरांचा ५८ वा वाढदिवस उत्साहात साजरा
सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन; शिक्षक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रेरणादायी सत्कार सोहळा
अमळनेर प्रतिनिधी) :
अमळनेर येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये संस्थेचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते मा. संदीप घोरपडे यांना मिळालेल्या “माननीय बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता पुरस्कार” निमित्त तसेच ज्येष्ठ शिक्षक विलास चौधरी सरांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी जाहीर सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.
पी.आर.के. प्रतिष्ठान, संगमनेर यांच्या वतीने दि. ८ मार्च रोजी मा. संदीप घोरपडे यांना आदर्श लोकनेता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानिमित्त शाळेत विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा. मगन भाऊसाहेब होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमकांत पाटील, ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब गुणवंतराव पाटील, संचालक श्री. किरण पाटील, ज्येष्ठ संचालक श्री. एस. जे. शेख, मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील, ज्येष्ठ शिक्षक श्री. जे. एस. पाटील तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तसेच साने गुरुजी व संस्थापक कै. बापूसाहेब गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर अध्यक्षांच्या हस्ते मा. संदीप घोरपडे व ज्येष्ठ शिक्षक विलास चौधरी यांचा शाल, पुष्पगुच्छ व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक श्री. जे. एस. पाटील यांनी केले. सत्काराला उत्तर देताना संदीप घोरपडे म्हणाले की, “हा सन्मान माझ्या केलेल्या कार्याची पावती असून तो मला समाजकार्यात आणखी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे.” तसेच त्यांनी सांगितले की, या महिन्यात सेवानिवृत्त होत असले तरी विलास चौधरी सरांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेकडून त्यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे.
विलास चौधरी सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “साने गुरुजी कन्या हायस्कूल व साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय या दोन्ही शाळांमध्ये कार्य करताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा ध्यास आयुष्यभर घेतला आणि पुढेही समाजासाठी कार्य करत राहीन.”
मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील यांनी आपल्या मनोगतात दोन्ही सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव केला. विद्यार्थिनींमधून इयत्ता नववी ‘ब’ मधील रेणुका लाड व श्रावणी पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
अध्यक्षीय भाषणात मगन भाऊसाहेब यांनी दोन्ही मान्यवरांच्या कार्याचे कौतुक करत घोरपडे सरांना मिळालेला आदर्श लोकनेता पुरस्कार हा त्यांच्या समाजकार्यास मिळालेली योग्य पावती असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. दीपक महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. दिलीप पाटील यांनी मानले.

