आर.आर. विद्यालयातील प्रशासकीय नियुक्त्यांसाठी शिक्षकांचे साखळी उपोषण; संघटनांना उपस्थित राहण्याचे आवाहन , सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदांवर नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित
![]()
आर.आर. विद्यालयातील प्रशासकीय नियुक्त्यांसाठी शिक्षकांचे साखळी उपोषण; संघटनांना उपस्थित राहण्याचे आवाहन
सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदांवर नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित
जळगाव प्रतिनिधी) – आर.आर. विद्यालयात मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक या महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार नियमित नियुक्ती करून संबंधितांना पदभार देण्यात यावा, तसेच या नियुक्त्या न झाल्यामुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय अडचणींचे तातडीने निराकरण व्हावे, या मागणीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहेत.
याबाबत उद्या दि. ११ मार्च २०२६ पासून मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद जळगाव यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यालयातील प्रशासकीय पदांच्या नियुक्त्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजात विविध अडचणी निर्माण होत असल्याची भावना शिक्षकांमध्ये व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटितपणे साखळी उपोषण करणार असून, या आंदोलनास शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य तसेच हितचिंतक शिक्षक मित्र परिवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
माध्यमिक शिक्षक संघाचे सेक्रेटरी एस. डी. भिरुड सर यांनी सर्व संघटना पदाधिकारी, सदस्य व शिक्षक बांधवांना उपोषणस्थळी पूर्ण वेळ उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.

