निवृत्तीच्या आधीच शिक्षकाने केले विद्यार्थी व पालकांचे तोंड गोड!* , ज्ञानदानाच्या सेवेला गोड स्पर्श; विलास चौधरी सरांनी वाढदिवशी विद्यार्थ्यांना दिली खास भेट
![]()
*निवृत्तीच्या आधीच शिक्षकाने केले विद्यार्थी व पालकांचे तोंड गोड!*
ज्ञानदानाच्या सेवेला गोड स्पर्श; विलास चौधरी सरांनी वाढदिवशी विद्यार्थ्यांना दिली खास भेट
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयातील शिक्षक विलास रतन चौधरी हे मार्च महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना तसेच त्यांच्या पालकांना गोड भेट म्हणून गावरानी तुपात बनवलेले लाडू पाकिटात वाटप केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे तर प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष हेमकांत पाटील, माजी अध्यक्ष गुणवंतराव पाटील, संचालक मगन वामन पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सर्वसाधारणपणे निवृत्त होण्याच्या दिवशी भेट देतात. परंतु ज्या शाळेमध्ये आपण 35 वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना आपण काहीतरी भेट दिली पाहिजे अशी कल्पना विलास चौधरी सर यांच्या मनात आली. ती कल्पना वाढदिवसाच्या दिवशी प्रत्यक्ष आचरणात आणली व विद्यार्थ्यांना व पालकांचे तोंड गोड केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने सेवा काळातील त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, स्वर्गीय माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांनी मला सेवेची संधी दिली. त्यांचे दातृत्व आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. डोळ्यासमोर त्यांचा आदर्श ठेवत लेकरांना गोड करावे व अशीच सदैव प्रेरणा मिळत राहील यासाठी सदैव प्रयत्नशील राहील.
अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना संदीप घोरपडे यांनी सांगितले की, सरांनी अत्यंत प्रामाणिक आणि सचोटीने आपले कर्तव्य केले याचा मनोमन आनंद आहे. आगामी काळात त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याची इच्छा असल्याचे देखील सूचक वक्तव्य त्यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, चौधरी सरांना कोणतेही काम दिले असेल तर ते काम शंभर टक्के होण्याची हमी होती. एक चांगला सहकारी आपल्यातून निवृत्त होईल याची खंत सदैव मनाला पोहोचत राहील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीष उघडे, सूत्रसंचालन डी. ए. धनगर यांनी तर आभार प्रदर्शन समाधान पाटील यांनी केले. त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना लाडू वाटप करण्यात आले.

