चर्मकार महिला संघातर्फे एकपात्री नाटिकेद्वारे महिला दिन साजरा!!!
![]()
चर्मकार महिला संघातर्फे एकपात्री नाटिकेद्वारे महिला दिन साजरा!!!
चर्मकार समाज हा महाराष्ट्रात कष्टकरी समाज म्हणून गणला जातो. या समाजाच्या उन्नतीसाठी त्या समाजातील अनेक लोकांचे वेगवेगळ्या नावाने संघटन निर्माण झालेले आहे. जळगाव येथे चर्मकार मंडळामार्फत विविध कार्यक्रम घेतले जातात. समाजाच्या एकत्रिकरणासाठी वाघनगर जळगाव येथे टुमदार संत रोहिदास प्रतिष्ठान सभागृह बांधण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम घेतले जातात. दिनांक ८ तारखेला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ जयश्रीताई विसावे राष्ट्रीय चर्मकार प्रदेशाध्यक्षा यांनी हार घालून प्रतिमा पूजन केले. प्रमुख पाहुण्या सौ. सुरेखाताई तायडे नगरसेविका ,सौ. ज्योतीताई निंभोरे, सौ हेमाक्षी वानखेडे,सौ. प्रतिभा बाविस्कर चर्मकार महिला अध्यक्षा ,सौ. जयश्री वाडेकर उपक्रमशील शिक्षिका, एक पात्री नाटिका सादर करणाऱ्या मीनाक्षी कांबळे ताई उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा बाविस्कर यांनी केले. कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे आकर्षण प्राध्यापक मीनाक्षीताई कांबळे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योतीताई निंभोरे यांनी केले. उपक्रमशील शिक्षिका उज्वला वाडेकर यांनी एकपात्री साठी तयार केलेल्या २ चिमुकल्यांनी एकपात्री नाटिका अप्रतिम सादर केल्या. त्यानंतर मीनाक्षी कांबळे यांचे बहारदार एकपात्री नाटिका सादर करण्यात आली. नाटिकेचा विषय होता ‘मी सावित्री बोलतोय’.यात सावित्रीबाई फुलेंच्या जीवनातील विविध प्रसंग हुबेहूब साकार केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विविध महिला पदाधिकारी तसेच असंख्य महिला उपस्थित होत्या. चर्मकार समाजातील पुरुष वर्गाने कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले.

