अखिल भारतीय डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेच्या पुणे महानगर अध्यक्षपदी विजय रणदिवे यांची एकमताने निवड
1 min read

अखिल भारतीय डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेच्या पुणे महानगर अध्यक्षपदी विजय रणदिवे यांची एकमताने निवड

Loading

अखिल भारतीय डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेच्या पुणे महानगर अध्यक्षपदी विजय रणदिवे यांची एकमताने निवड

पुणे : केंद्रीय अध्यक्ष मा. राजा माने यांच्या मान्यतेने अखिल भारतीय डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेच्या पुणे महानगर अध्यक्षपदी सुदर्शन टी.व्ही.चे पुणे ब्युरो चीफ मा. विजय रणदिवे यांची एकमताने निवड करण्यात आली.

या निवडीप्रसंगी केंद्रीय उपाध्यक्ष मा. अमोल पाटील व मा. महेश कुगावकर उपस्थित होते. तसेच नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी स्वतःहून शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे मावळते अध्यक्ष मा. महेश टेळे पाटील हेही यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला पुणे शहरातील सर्व कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय पुणे शहरातील प्रिंट आणि डिजिटल माध्यमातील पत्रकारांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली.

यावेळी येत्या २९ मार्च रोजी पुणे शहरातील पत्रकारांच्या सशक्तीकरणासाठी पुणे शहर कार्यकारिणीच्या वतीने “सक्षम पत्रकार कार्यशाळा” आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

नूतन अध्यक्ष मा. विजय रणदिवे यांनी सांगितले की, आगामी काळात पत्रकारांच्या घराच्या प्रश्नांवर, वैद्यकीय मदतीसाठी योजना तसेच व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच येत्या दोन दिवसांत पुणे शहराची सविस्तर कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी नूतन अध्यक्षांचे अभिनंदन केले. तसेच केंद्रीय अध्यक्ष मा. राजा माने, प्रदेशाध्यक्ष मा. सतीश सावंत, महासचिव मा. विकास भोसले तसेच राज्य व केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे मा विजय रणदिवे यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *