“क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाची उज्ज्वल ज्योत”
![]()
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले
माय सावित्री
किती वर्णावी
तुझी थोरवी
तुझ्या मुळेच आम्हाला
जगण्याची दृष्टी
मिळाली नवी…!
अगदी खरेचं हं!आज आम्ही मुलींनी, महिला भगिनींनी जे काही शिक्षण घेतलं ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वामुळे.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिनांक ३जानेवारी १८३१ मध्ये , सातारा जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील, नायगाव येथे झाला.
अतिशय गुणवान सावित्री, त्या काळात लहान वयातच मुलांंची लग्न होत. सन १८४० मध्ये, वयाच्या नवव्या वर्षीच त्यांचा विवाह ज्योतीराव फुले यांच्याशी झाला. ज्योतीबांच वय तेरा वर्षे होत.ज्योतिरावांनी त्यांच्या लग्नानंतर सावित्रीबाईंना आपल्या घरीच शिक्षण दिले.
१जानेवारी १८४८ रोजी, पुण्यातील भिडे वाड्यात त्यांनी मुलींसाठी शाळा सुरु केली. त्या काळात मुलींना शिक्षण घेता येत नव्हते. म्हणून त्यांनी घरोघरी जाऊन शिक्षण दिले. त्यांच्या वर अनेक संकटे आली. परंतु त्या डगमगल्या नाहीत.
त्यांनी समाज सुधारणा केल्या.
स्त्रीच्या पतिच्या मृत्यू नंतर तिचे केशवपन केले जात असे. म्हणून त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला.
तसेच बालहत्या प्रतिबंधक गृह १९६३ मध्ये स्थापन केले.
समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलें सोबत खांद्याला खांदा लावून कार्य केले. व सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
त्या उत्तम कवयित्री होत्या. त्यांनी काव्यफुले, आणि बावनकशी, सुबोध रत्नाकर, हे काव्यसंग्रह प्रकाशित केले.
दिनांक १० मार्च १८९७रोजी, प्लेगच्या रुग्णांची सेवा करतांना त्यांना संसर्ग झाला. आणि त्यातच त्यांचे पुण्यात निधन झाले.
सावित्री बाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील आणि सामाजिक समतेतील योगदान अमूल्य असून त्यांना क्रांती ज्योती म्हणून ओळखले जाते.
अशा भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका क्रांती ज्योती सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन!
माय सावित्री
आम्हीही चालत राहू
तुझ्याच वाटेने
उजेड वाटत, उजेड वाटत…!
अनुपमा जाधव.
साहित्यिक डहाणू



