संगमनेर येथे रविवारी राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांना ‘मा. ना. बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता’ पुरस्कार जाहीर
![]()
संगमनेर येथे रविवारी राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा,
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांना ‘मा. ना. बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता’ पुरस्कार जाहीर
संगमनेर प्रतिनिधी :
पी.आर.के. प्रतिष्ठान, संगमनेर (जि. अहमदनगर) यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा – २०२६ रविवारी दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य सोहळा के. बी. दादा देशमुख सभागृह, सह्याद्री महाविद्यालय, संगमनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे असणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. याशिवाय संत साहित्य अभ्यासक व देहूचे माजी सरपंच महादेव कंद, डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीतभाऊ थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, शंकर पाटील खेमनर, अजयदादा फटांगरे, निरज सिद्धार्थ मुकुंदे, तुषारभाऊ शिंदे, चंद्रकांत घुले, अॅड. अशोक हजारे, संजय क्षीरसागर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीपजी घोरपडे, राष्ट्र सेवा दलाचे राज्याध्यक्ष राजाभाऊ कांबळकर, सिताराम राऊत, राजाभाऊ अवसक, जयरामभाऊ ढेंरंगे, उद्योजक गगन थोरात, किरणभाऊ रोहम, बाबासाहेब भोसले, अमोलभाऊ गुंजाळ यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या राज्यस्तरीय सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. बुलढाणा येथील ग्रामगीता प्रचारक सुधाकर पाटील यांना ‘वारकरी रत्न’, शिरूर येथील विजय महाराज भोईरकर यांना ‘वारकरी भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांना ‘मा. ना. बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय अभिनेते व शिवप्रबोधनकार डॉ. सागर फापाळे यांना ‘डॉ. सुधीरजी तांबे धन्वंतरी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करणाऱ्या या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे समन्वयक संदीप काकड, गिरीश काकड व अंतोन मिसाळ यांनी केले आहे.
शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात अभ्यासू व प्रभावी कार्य करणारे, साने गुरुजी शिक्षण मंडळाचे सचिव तसेच उत्कृष्ट वक्ते मा. संदीपजी घोरपडे यांची “मा. ना. बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता पुरस्कार” साठी झालेली निवड ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
त्यांच्या कार्याचा हा योग्य गौरव असून शिक्षण व समाजकारणातील त्यांचे योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
💐💐💐💐💐
ईश्वर आर महाजन पत्रकार

