साई इंग्लिश अकॅडमितर्फे “साई रत्न” पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; १३३ हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव
![]()
साई इंग्लिश अकॅडमितर्फे “साई रत्न” पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; १३३ हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील साई इंग्लिश अकॅडमि तर्फे विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रतिष्ठेचा “साई रत्न” पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. एम. जे. हॉल येथे आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. संदीप घोरपडे सर होते, तर श्री. भाऊसाहेब देशमुख आणि सौ. प्रतिभा मगर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.
या प्रसंगी मृणल पाटील, कल्याणी पाटील आणि विष्णू सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करत अकॅडमीने दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पालक प्रतिनिधी म्हणून सौ. शीतल मोरे मॅडम आणि श्री. नितीन भदाणे यांनीही विद्यार्थ्यांच्या यशामागील अकॅडमीच्या योगदानाचे कौतुक केले.
या सोहळ्यात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या १३३ हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यंदाचा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि प्रेरणादायी “साई रत्न” पुरस्कार
कल्याणी संदीप पाटील, गार्गी सुनील जोशी, घनिका प्रशांत मालुसरे आणि लिनाली प्रमोद ठाकरे यांना प्रदान करण्यात आला.
तसेच सातत्याने शाळेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नेहा राकेश पाटील हिला विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैय्यासाहेब मगर (संचालक, साई इंग्लिश अकॅडमि) यांनी केले. प्रियंका बारी हिने उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, तर रीचल पाटील हिने आभार प्रदर्शन केले.
साई इंग्लिश अकॅडमिच्या या प्रेरणादायी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना वाढीस लागून त्यांना भविष्यात नवनव्या उंची गाठण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

