३० वर्षांनंतर जुने मित्र एकत्र; पातोंडा येथील दत्त विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
![]()
३० वर्षांनंतर जुने मित्र एकत्र; पातोंडा येथील दत्त विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
अमळनेर प्रतिनिधी :
ता. अमळनेर येथील पातोंडा गावातील श्री दत्त विद्यामंदिर शाळेच्या सन १९९४-९५ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहबंध मेळावा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल तीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय जीवनातील सुवर्णक्षण पुन्हा अनुभवले.
या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक व प्राचार्य दे.रा. जगताप सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील निवृत्त शिक्षक आर. एस. पटवे सर, आर. डी. पवार सर, धर्मराज झंजने सर, आर. जी. शिंदे सर, गांगुर्डे मॅडम, प्रदीप लोहारे सर, व्ही. सी. पाटील सर, विजय झंजने, राजू सन्दान शिव तसेच दिवंगत शिक्षकांच्या कुटुंबीयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेची प्रार्थना व विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन करण्यात आली. त्यानंतर पुढील कार्यक्रम माहीजी देवी तीर्थक्षेत्र, पातोंडा येथे आयोजित करण्यात आला. सुरुवातीला दीपप्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.
यावेळी सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा परिचय करून देण्यात आला. गेल्या तीस वर्षांच्या जीवनप्रवासातील संघर्ष आणि यशोगाथा काही विद्यार्थ्यांनी मनोगतातून मांडल्या. विशेषतः किरण शिंदे, हिरालाल माळी व शरद ठाकरे यांनी जीवनातील संघर्षमय प्रवास सांगताना उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला.
यानंतर सर्वांनी एकत्र येत रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला आणि जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे बंध अधिक दृढ केले.
या स्नेहबंध मेळाव्यास अश्विनी जोशी, अश्विनी पवार, साधना बोरसे, मनीषा महाले, शारदा पवार, बबीता चव्हाण, नम्रता बागुल, सुनिता शिरसाट, रेखा सूर्यवंशी, वंदना लोहार, शीतल राठोड, सुनीता पवार, अनिता पवार, जयश्री पवार, सोनाली जाधव यांच्यासह प्रवीण लाड, सुरेश पाटील, अविनाश पाटील, शंकर माळी, काशिनाथ सोनवणे, किरण शिंदे, गोकुळ पाटील, दत्तात्रेय कोळी, दिनकर पवार, बाळासाहेब शिरसाट, दिलीप बिरारी, प्रल्हाद बोरसे, प्रवीण धुमाळ, ज्ञानेश्वर कोळी, सुनील सैंदाणे, भुरा सनदान शिव, विजय मुसळे, योगेंद्र पवार, रावसाहेब पाटील, विनोद बाविस्कर, विनोद सोनवणे, शरद ठाकरे, निंबा भोई, संजय बिरारी, अतुल पवार, सतीश वाडीले, समाधान बिरारी, हिरालाल माळी आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी शिंदे सर, झंजने सर आणि प्रदीप लोहारे सर यांनी विद्यार्थ्यांना जीवनात प्रामाणिकपणे पुढे जाण्याचा संदेश देत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात दे.रा. जगताप सर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत शाळेच्या संस्कारांची आठवण करून दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पवार, प्रवीण लाड आणि शरद ठाकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण लाड, किरण शिंदे, सुरेश पाटील, हिरालाल माळी, शरद ठाकरे, अतुल पवार, अश्विनी पवार, अश्विनी जोशी व सुनिता पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
३० वर्षांनंतर एकत्र आलेल्या या स्नेहबंध मेळाव्यामुळे मैत्रीचे बंध अधिक दृढ झाले आणि शालेय जीवनाच्या आठवणींनी वातावरण भावूक झाले.



