श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल, नगांव चे घवघवीत यश
![]()
श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल, नगांव चे घवघवीत यश
अमळनेर प्रतिनिधी
मुंबई येथील रंगोत्सव सेलिब्रेशन संस्था तसेच Indian Talent Olympiad (ITO) मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल, नगांवच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत शाळेतील कुमारी लावण्या प्रशांतगीर गोसावी हिला चित्रकला क्षेत्रातील ‘राजा रवी वर्मा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच चि. फरहानशहा सुलतानशहा फकीर याला ‘एम. एफ. हुसेन पुरस्कार’ हे दोन मनाचे पुरस्कार मिळाले .
याशिवाय शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सीमा पाटील यांना ग्रामीण भागातील शाळेसाठी Indian Talent Olympiad (ITO) मार्फत ‘बेस्ट प्रिन्सिपॉल अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शाळेला ‘World Prestige Award’ ने गौरविण्यात आले असून, हा मान मिळवणारी ग्रामीण भागातील एकमेव शाळा ठरली आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री चेतन खैरनार, सचिव श्री तुषार बागल, तसेच शाळेच्या चेअरमन श्रीमती चेतना बागल यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.
रंगोत्सव सेलिब्रेशन कडून पुढील विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले –
तन्वी सुमित गोसावी, भौमिक जगदीश गोसावी, भार्गव कुमावत.
तसेच पुढील विद्यार्थ्यांना पदक प्रदान करण्यात आले –
रितेश वासुदेव पाटील, रिद्धीमा भूषण गिरी, यशवी दीपक जाधव, मिहीर भरत गिरी गोसावी, भूमी जितेंद्र गिरी गोसावी.
उत्तेजनार्थ बक्षीस –
भूमी अनिल पाटील व कामिनी लक्ष्मण बिऱ्हाडे यांना देण्यात आले.
या सर्व यशामुळे शाळेचे नाव तालुका व जिल्हास्तरावर उज्ज्वल झाले असून पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

