प्रलंबित प्रश्नांसाठी जुक्टो पदाधिकाऱ्यांची वेतन पथक अधीक्षकांकडे धडक भेट
1 min read

प्रलंबित प्रश्नांसाठी जुक्टो पदाधिकाऱ्यांची वेतन पथक अधीक्षकांकडे धडक भेट

Loading

प्रलंबित प्रश्नांसाठी जुक्टो पदाधिकाऱ्यांची वेतन पथक अधीक्षकांकडे धडक भेट

जळगांव प्रतिनिधी
जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांच्या तातडीने सोडवणुकीसाठी जळगाव जुक्टो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मा. वेतन पथक अधीक्षकांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. शिक्षकांना भेडसावत असलेल्या आर्थिक व प्रशासकीय अडचणींबाबत संघटनेने ठोस भूमिका मांडत त्वरित कार्यवाहीची मागणी केली.
या भेटीत जुक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा. श्री. नंदन वळिंकार, जेष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड, डॉ. अतुल इंगळे, उपाध्यक्ष प्रा. गजानन वंजारी, उपप्राचार्य प्रा. संजय पाटील (नूतन मराठा ज्युनिअर कॉलेज) तसेच कार्यकारिणी सदस्य प्रा. स्वप्नील धांडे (जळगाव महानगर) उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पुढील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली —

गेल्या ५-६ वर्षांपासून शिक्षकांना पी.एफ. हिशेबाच्या पावत्या मिळालेल्या नसून त्या नियमितपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी तात्काळ उपाययोजना करावी.

मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे जीपीएफ प्रस्ताव विलंब न लावता मंजूर करावेत.

थकीत वेतन, डी.ए. वाढीचा फरक तसेच वरिष्ठ/निवड श्रेणीचा फरक याबाबतची देयके तत्काळ अदा करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाशी समन्वय साधून कार्यवाही करावी.

शिक्षकांची वैद्यकीय देयके त्वरित मंजूर करून अदा करावीत.

एन.पी.एस. धारक शिक्षकांची मासिक वर्गणी नियमितपणे त्यांच्या खात्यात जमा व्हावी तसेच प्रलंबित वर्गणी तातडीने जमा करण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
जुक्टो पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शिक्षकांचे आर्थिक प्रश्न प्रलंबित राहिल्याने त्यांच्या मनोबलावर परिणाम होत असून शैक्षणिक कार्यावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
मा. वेतन पथक अधीक्षकांनी संघटनेचे म्हणणे गांभीर्याने ऐकून संबंधित बाबींची पडताळणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती जुक्टो संघटनेच्या वतीने देण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *