कृष्ण गीता नगर येथे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा व नगरसेवकांचा ग्रंथ देऊन सत्कार !.., कृष्ण गीता नगरच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध : लीलाताई चौधरी ( नगराध्यक्षा )
![]()
कृष्ण गीता नगर येथे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा व नगरसेवकांचा ग्रंथ देऊन सत्कार !..
कृष्ण गीता नगरच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध : लीलाताई चौधरी ( नगराध्यक्षा )
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगाव – शहरातील नगरपरिषद हद्दीतील कृष्ण गीता नगर येथे कॉलनीवासीयांच्या वतीने धरणगाव नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, नगरसेवक व नगरसेविकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल गुलाबपुष्प व महापुरुषांचे अनमोल ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.प्रस्ताविक पी डी पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलनीचेअध्यक्ष बी एम सैंदाणे होते.प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष लिलाबाई सुरेश चौधरी, उपनगराध्यक्ष सुरेखा विजय महाजन यासह नगरीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. याप्रसंगी नगरसेवक गुलाब मराठे, सुनील चौधरी, विजय महाजन, किरण अग्निहोत्री यांनी मनोगत व्यक्त केले. लोकनियुक्त नगराध्यक्ष लीलाताई चौधरी यांनी महापुरुषांचे पुस्तक भेट दिल्याचे कौतुक केले.आम्ही सर्वजण कृष्ण गीता नगरच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत असे आश्वासन दिले.
याप्रसंगी कॉलनीचे अध्यक्ष बी एम सैंदाणे, उपाध्यक्ष विनायक न्हावी, सचिव महेंद्र सैनी, प्रल्हाद विसपुते, भरत पाटील, महेंद्र बिवाल, गोकुळ महाजन, पंकज मिस्तरी, चंदन बिवाल, जगन्नाथ भोई, प्रविण भोई, अमोल धनगर, एस एन कोळी , जे एस पवार, ज्ञानेश्वर पवार, राजेंद्र भोई, निलेश गुरव, निलेश कुलट, अनिल कुलट, मनोहर बन्सी यासह कॉलनीतील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार पी डी पाटील यांनी मानले.

