५५०० विद्यार्थ्यांमधून अमळनेरच्या गुरू मनोज मोरेचा राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक , प्रोॲक्टिव्ह अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश; उत्कृष्ट कामगिरी ट्रॉफीने सन्मान
1 min read

५५०० विद्यार्थ्यांमधून अमळनेरच्या गुरू मनोज मोरेचा राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक , प्रोॲक्टिव्ह अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश; उत्कृष्ट कामगिरी ट्रॉफीने सन्मान

Loading

५५०० विद्यार्थ्यांमधून अमळनेरच्या गुरू मनोज मोरेचा राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक

प्रोॲक्टिव्ह अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश; उत्कृष्ट कामगिरी ट्रॉफीने सन्मान

अमळनेर प्रतिनिधी :
पुणे येथील गणेश क्रीडा कला मंच येथे दि. २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या प्रोॲक्टिव्ह अबॅकस राष्ट्रीय स्पर्धा २०२५-२६ मध्ये अमळनेरच्या विद्यार्थ्याने भव्य यश संपादन करत तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. देशभरातून तब्बल ५५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत अमळनेर येथील गुरू मनोज मोरे याने चौथा क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.
चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या वेगवान गणनकौशल्य, एकाग्रता व मानसिक चपळतेची कसोटी पाहण्यात आली. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षेत गुरूने उत्कृष्ट कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाबद्दल त्याला “उत्कृष्ट कामगिरी” ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
गुरू मनोज मोरे हा अमळनेर येथील वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित पर्ल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असून तो गार्गी प्रोॲक्टिव्ह अबॅकस वर्ग येथे प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या या यशामुळे अमळनेरच्या शैक्षणिक गुणवत्तेला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.
या अभिमानास्पद यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत भदाणे सर, प्राचार्या श्रीमती गायत्री भदाणे मॅडम तसेच कुंजल पाटील मॅडम, उत्कर्षा लोकंक्षी मॅडम, वैशाली पाटील मॅडम, विजय चौधरी सर आणि सखाराम पावरा यांनी गुरूचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गुरूच्या यशामुळे अमळनेरमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्या जिद्दीला, परिश्रमांना आणि मार्गदर्शकांच्या योग्य प्रशिक्षणाला मिळालेली ही सार्थ पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *