गुरूकुल परंपरेतून बासरी साधनेचा अनोखा मेळावा : अमळनेरमध्ये मोफत बासरी वादन शिबीर
1 min read

गुरूकुल परंपरेतून बासरी साधनेचा अनोखा मेळावा : अमळनेरमध्ये मोफत बासरी वादन शिबीर

Loading

गुरूकुल परंपरेतून बासरी साधनेचा अनोखा मेळावा : अमळनेरमध्ये मोफत बासरी वादन शिबीर

अमळनेर प्रतिनिधी: भारतीय शास्त्रीय संगीतातील सुरांचा गंध दरवळविणारे आणि पं. हरिप्रसाद चौरसिया तसेच पं. विवेक सोनार यांच्या गुरूकुल परंपरेचा वारसा जपणारे बासरी वादन मोफत शिबीर अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे. संगीतप्रेमींसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
साने गुरूजी विद्यालय, संगीत विभाग अंमळनेर यांच्या वतीने मंगळवार दि. ०३ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० ते सायं. ५.०० या वेळेत हे दिवसभराचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ठिकाण – साने गुरूजी विद्यालय, अमळनेर, जि. जळगाव.
या शिबिरासाठी वय वर्ष दहा व त्यावरील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार असून सहभागीनी स्वतःचा जेवणाचा डबा सोबत आणावा, अशी सूचना आयोजकांनी केली आहे.
पया शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत प्रख्यात बासरी साधक श्री. योगेश पाटील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरांची साधना, श्वास नियंत्रण, रागांची ओळख व बासरी वादनातील बारकावे यांचा सखोल अभ्यास करता येणार आहे.
संगीतप्रेमी व इच्छुकांनी अधिक माहितीसाठी श्री. संदीप घोरपडे सर (९४२२२७९७१०) व श्री. तुषार पुराणीक सर (७०३८३३०४३४) यांच्याशी संपर्क साधावा.
संगीत साधनेतून व्यक्तिमत्त्व विकासाची वाट खुली करणारे हे शिबीर अमळनेरकरांसाठी एक अनमोल संधी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *