राष्ट्रीय विज्ञान दिननिमित्त सूक्षजीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे संशोधनात्मक सादरीकरण*
![]()
*राष्ट्रीय विज्ञान दिननिमित्त सूक्षजीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे संशोधनात्मक सादरीकरण*
—————————————–
अमळनेर- 28 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिननिमित्त प्रताप महाविद्यालयातील सूक्ष्म जीवशास्त्र विषयाच्या एम.एस्सी च्या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक व त्यांनी केलेले समाजोपयोगी संशोधनाचे कार्य तसेच उल्लेखनीय संशोधन करुनही ज्यांच्या कार्याची दखल घेतली गेली नाही असे वैज्ञानिक याच्याबद्दलच्या माहितीचे सादरीकरण केले.भूषण सोनवणे, सायमा तेली, दिव्या वडनेरे, मोहिनी वारुडे, लीना चौधरी यांनी अनुक्रमे इतिहासात कधीही समाजासमोर ज्यांच्या संशोधनाची दखल घेतली गेली नाही अशा महिला वैज्ञानिक,रॉबर्ट कोच, डॉ.विभा चौधरी,सेलमन वॅक्समन व अलेक्झांडर फ्लेमिंग या वैज्ञानिकांचे संशोधनात्मक कार्य व त्याचा समाजासाठी झालेला उपयोग याविषयी पॉवर पॉइंट प्रेजेंटेशन सादर केले.याप्रसंगी विभागप्रमुख प्रा.एस.ए.जोशी यांनी विद्यार्थ्यांना स्टार्ट अप च्या नाविन्यपूर्ण प्रकारांबद्दल मार्गदर्शन केले. सायमा तेली या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा.हेमलता सूर्यवंशी-भोसले यांनी समारोपपर मार्गदर्शन केले. यावेळी विभागातील प्रा.वैशाली महाजन,प्रा.भावना महाजन, प्रा.नेहा महाजन, प्रा.ममता महाजन,प्रा.कल्याणी पाटील , प्रा.औक्षणी साळुंखे व प्रा.दिव्या महाजन व पदवी-पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते.

