प्राचार्य डॉ. संजय सोनवणे यांची ‘एमफुक्टो’ उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड; उच्च शिक्षण क्षेत्रातील नेतृत्वाला नवी दिशा
1 min read

प्राचार्य डॉ. संजय सोनवणे यांची ‘एमफुक्टो’ उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड; उच्च शिक्षण क्षेत्रातील नेतृत्वाला नवी दिशा

Loading

प्राचार्य डॉ. संजय सोनवणे यांची ‘एमफुक्टो’ उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड; उच्च शिक्षण क्षेत्रातील नेतृत्वाला नवी दिशा

अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (Maharashtra Federation of University and College Teachers’ Organisation – MFUCTO) यांच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत प्राचार्य डॉ. संजय सोनवणे यांची ‘एमफुक्टो’च्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात त्यांच्या नेतृत्वाला नवी उंची प्राप्त झाली आहे.
या बैठकीत कार्यकारी परिषदेवर (Executive Council) प्रा. नितीन बाविस्कर, प्रा. डॉ. सचिन नांद्रे आणि प्रा. एकनाथ नेहते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच जनरल कौन्सिलवर प्रा. डॉ. अजय पाटील, प्रा. डॉ. शैलेश वाघ, प्रा. डॉ. लिलाधर पाटील, प्रा. डॉ. मोहन पावरा, प्रा. डॉ. महेंद्र पाटील, प्रा. डॉ. महेश गांगुर्डे, प्रा. डॉ. अविनाश निकम आणि प्रा. डॉ. संगीता पिंपरे यांची पुढील दोन वर्षांसाठी नियुक्ती जाहीर करण्यात आली.
बैठकीदरम्यान उच्च शिक्षण क्षेत्रासमोरील विविध ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, प्राध्यापक भरती प्रक्रिया, नेट-सेट प्राध्यापकांच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाची तयारी, वर्कलोडचे नियोजन, जुनी पेन्शन योजना, डीसीपीएस, एम.फिल/पीएच.डी. इन्क्रिमेंट, कॅस बेनिफिट आदी विषयांवर व्यापक विचारमंथन झाले.
पुढील दोन वर्षांत उच्च शिक्षण क्षेत्रात मोठे बदल अपेक्षित असून, या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांनी संघटितपणे आणि दूरदृष्टीने कार्य करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. प्राचार्य डॉ. संजय सोनवणे यांच्या निवडीमुळे शिक्षकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या या बिनविरोध निवडीबद्दल विविध शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, उच्च शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *