भोंदूगिरीवर विज्ञानाचा प्रहार; भविष्यातील शास्त्रज्ञ घडविण्याचा संकल्प”  साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विज्ञान दिन उत्साहात साजरा
1 min read

भोंदूगिरीवर विज्ञानाचा प्रहार; भविष्यातील शास्त्रज्ञ घडविण्याचा संकल्प” साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विज्ञान दिन उत्साहात साजरा

Loading

“भोंदूगिरीवर विज्ञानाचा प्रहार; भविष्यातील शास्त्रज्ञ घडविण्याचा संकल्प”

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विज्ञान दिन उत्साहात साजरा

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात दि. २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे सचिव श्री. संदीप घोरपडे यांनी भूषविले. प्रमुख वक्ते म्हणून नोबेल फाउंडेशनचे संचालक श्री. जयदीप पाटील सर उपस्थित होते. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष आप्पासाहेब गुणवंत पाटील व कार्यकारी संचालक मंडळाचे सभासद मगन वामनराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. विलास चौधरी सर, श्री. डी. वाय. पाटील सर, विज्ञान शिक्षक श्री. डी. ए. धनगर सर, सौ. वैशाली महाजन मॅडम, कु. हर्षल पवार सर, श्री. यशोदीप बागल सर व सौ. निकिता पाटील मॅडम यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील सर यांनी केले. प्रमुख वक्ते श्री. जयदीप पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रभावी मार्गदर्शन करताना भारतातून अधिकाधिक शास्त्रज्ञ घडावेत, यासाठी आवश्यक असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज अधोरेखित केली. त्यांनी भारतातील सामाजिक व शैक्षणिक व्यवस्थेतील काही त्रुटींवर भाष्य करत, आपल्या १४० कोटी लोकसंख्येच्या देशात विज्ञान क्षेत्रात केवळ एकदाच नोबेल पारितोषिक मिळाल्याची बाब चिंताजनक असल्याचे सांगितले. भविष्यात अनेक शास्त्रज्ञ भारतातून घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिज्ञासा, संशोधनवृत्ती आणि चिकाटी जोपासावी, असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी पंचसूत्री दिली—
१) इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवा,
२) मोबाईलचा अतिवापर टाळा,
३) नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा,
४) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारखे आधुनिक विषय शिका,
५) वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासा.

यावेळी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी “भोंदूगिरीवर विज्ञानाचा प्रहार” या संकल्पनेवर आधारित प्रयोग सादर करून सर्वांची मने जिंकली. विना आगपेटी आग लावणे, अंगात येणे, मंतरलेल्या वस्तू यांसारख्या तथाकथित चमत्कारांमागील वैज्ञानिक कारणे त्यांनी प्रत्यक्ष प्रयोगातून स्पष्ट केली. या प्रयोगांनी उपस्थितांना अक्षरशः अवाक केले.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. जयदीप पाटील सर व कार्यकारी संचालक मंडळाने मनापासून कौतुक केले. तसेच “Out of the Box” या पुस्तकाची विद्यार्थ्यांना भेट देऊन त्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील सर व ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. ए. धनगर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन श्री. यशोदीप बागल सर व सौ. वैशाली महाजन मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. निकिता पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *