व्हाईस ऑफ मिडिया प्रदेश उपाध्यक्षांच्या राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान सातारा जिल्ह्यात आढावा बैठक संपन्न
1 min read

व्हाईस ऑफ मिडिया प्रदेश उपाध्यक्षांच्या राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान सातारा जिल्ह्यात आढावा बैठक संपन्न

Loading

व्हाईस ऑफ मिडिया प्रदेश उपाध्यक्षांच्या राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान सातारा जिल्ह्यात आढावा बैठक संपन्न

सातारा (प्रतिनिधी):
राज्यात कार्यरत असलेली जगातील एकमेव संघटना म्हणून ओळख असलेल्या व्हाईस ऑफ मिडिया या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मा. विजय चोरडिया यांच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या निमित्ताने आज सातारा जिल्ह्यात आढावा बैठक उत्साहात पार पडली. यावेळी डिजिटल मीडिया विंगचे उपाध्यक्ष मा. इरशाद शेख तसेच पुणे विभागीय अध्यक्ष श्री सचिव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
सातारा येथील गेस्ट हाऊस येथे आयोजित बैठकीत जिल्हाध्यक्ष श्री अनिल करंदकर, उपाध्यक्ष श्री अमर बनसोडे पाटील आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे सहर्ष स्वागत केले. बैठकीची सुरुवात संघटनेच्या कार्याचा आढावा घेऊन करण्यात आली.
प्रदेश उपाध्यक्ष विजय चोरडिया यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संघटनेच्या पंचसूत्री कार्यक्रमावर विशेष भर देत संघटन बळकटीकरणाचे आवाहन केले. संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने सातारा जिल्ह्याचे उत्तर व दक्षिण अशा दोन विभागांत विभाजन करण्यात आले.
या वेळी पुढील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या:
उत्तर विभाग अध्यक्ष – समद अत्तार
दक्षिण विभाग अध्यक्ष – मोहन बोरकर
सातारा जिल्हा कार्याध्यक्ष – शिवाजी निकम
उत्तर विभाग कार्याध्यक्ष – जगन्नाथ सोनावले
नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
बैठकीस सातारा जिल्हा सचिव सुयोग सोनावणे, जिल्हा प्रवर्तक राहूल पवार, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर जाधव, जावली तालुका अध्यक्ष अभिजित शिंगटे, सचिव मोहन खुडे, खजिनदार सुधाकर दुंदळे, तसेच रामचंद्र ढेबे, शाहरुख बागवान (खटाव), विजय शेळके, सुनिल रासकर (खंडाळा संपर्क प्रमुख), लक्ष्मण शिर्के, संजय भाडळकर, हेमंत धायगुडे (सातारा जिल्हा संपर्क प्रमुख), अजित जाधव (खंडाळा) आणि संदीप माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत संघटनेच्या आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *