काना मात्रा उकार वेलांटीने सजलेली आपली मराठी भाषा. – गुलाबराव पाटील
1 min read

काना मात्रा उकार वेलांटीने सजलेली आपली मराठी भाषा. – गुलाबराव पाटील

Loading

*काना मात्रा उकार वेलांटीने सजलेली आपली मराठी भाषा.*
– गुलाबराव पाटील

ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी)
* – कविता नाटक, कथा, कादंबरी चारित्र्य अशा विविध रूपात नटलेल्या विद्यार्थ्यांनी सम्राट अशोक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. यावेळी वारकरी, सावित्रीबाई, मीराबाई, बहिणाबाई,संत तुकाराम, गाडगे बाबा, शांता शेळके अशा साहित्यिकांच्या भूमिकेत विद्यार्थी अवतरले होते. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी लोकगीतेच्या नृत्यातून केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुसुमाग्रजांच्या भूमिकेतील इयत्ता आठवीचा विद्यार्थी आयुष तपासे होता. साहित्यिकांच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देत मराठी भाषेत आपले महत्व थोडक्यात सांगितले कथा, कविता, नाटक,कादंबरी अशा विविध रूपात आलेल्या विद्यार्थ्यांनीही मराठी भाषेत असलेले आपले योगदान सांगितले. विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे सहशिक्षक ओमप्रकाश धनविजय व रामदास बोऱ्हाडे यांचे मार्गदर्शन लाभले मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले.मराठी भाषा ही काना, मात्रा, उकार,वेलांटी ने सजलेली आहे बोलायला सोपी आहे परंतु लिहायला कठीण आहे. आपण सर्वांनी सुंदर अक्षरात मराठी भाषा लिहिली पाहिजे जोपासली पाहिजे. आपल्या भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने अधिकच महत्त्व प्राप्त झाले असेही म्हणाले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष पी.टी. धनविजय माध्य. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील व प्राथमिकच्या प्रभारी मुख्याध्यापिका विजया तांबे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीची अभिलाषा कदम या विद्यार्थिनीने केले. तर पल्लवी कुर्टे या विद्यार्थिनीने उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *