अहिराणीच्या गोडीने मराठीचा गौरव’ – वसुंधरा लांडगे यांची झी २४ तासवर दमदार काव्यझेप
1 min read

अहिराणीच्या गोडीने मराठीचा गौरव’ – वसुंधरा लांडगे यांची झी २४ तासवर दमदार काव्यझेप

Loading

‘अहिराणीच्या गोडीने मराठीचा गौरव’ – वसुंधरा लांडगे यांची झी २४ तासवर दमदार काव्यझेप

अमळनेर प्रतिनिधी –
मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने संपूर्ण राज्यभरात मराठी भाषेचा उत्सव साजरा होत असताना अमळनेरच्या मातीतून एक अभिमानास्पद क्षण उभा राहिला. खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त तसेच उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसुंधरा ताई लांडगे यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी झी २४ तास मराठी या लोकप्रिय वृत्तवाहिनीवर आपली स्वरचित अहिराणी कविता सादर करत मराठी भाषा दिनाला वेगळीच उंची प्राप्त करून दिली.
कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या या विशेष दिवशी ताईंनी सादर केलेली कविता केवळ शब्दांची मांडणी नव्हती, तर ती मराठी आणि अहिराणी या दोन्ही भाषांबद्दलच्या प्रेमाची भावस्पर्शी अभिव्यक्ती होती. त्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि राज्यभरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव झाला.

मराठी-अहिराणीचा अनोखा संगम

ताईंच्या कवितेतील ओळींनी प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकले—

“अहिराणी नि मराठी दोन्ही मावस बहीणी,
एक दुधवरनी थरी, एक दहिमानं लोणी…”

या ओळींमधून मराठी आणि अहिराणी या भाषांचा नातेसंबंध किती जिव्हाळ्याचा आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले. मराठी संतपरंपरेचा गौरव करताना त्यांनी संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, मुक्ताबाई यांचा उल्लेख करून भाषेच्या आध्यात्मिक परंपरेला उजाळा दिला.

“संत ज्ञानेश्वर, नामदेव तुकाराम, मुक्ताबाई,
मराठीनं कवतुक करे संत बहिणाबाई…”

मराठी भाषेचा गोडवा, तिची ताकद आणि अभिजात दर्जाकडे झेपावणारी वाटचाल या सर्व गोष्टी ताईंनी आपल्या कवितेतून प्रभावीपणे व्यक्त केल्या.

कवयित्री, सूत्रसंचालक आणि भाषाप्रेमी व्यक्तिमत्व

वसुंधरा ताई लांडगे या केवळ विश्वस्तच नाहीत
त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे अनेक पद त्यांच्याकडे स्वतःहून चालून येतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे आजही ते अनेक पदांवर कार्यरत आहेत लग्न सोहळा असेल ते अत्यंत छान असा सत्यशोधक पद्धतीने पार पाडतात.. आजतागायत अनेक लग्न त्यांनी लावले आहेत… छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्यावर अनेक पोवाडे व या महापुरुषांची पारायण त्यांनी केली आहेत
, तर एक उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या कवयित्री आहेत. यापूर्वीही त्यांनी मराठी व अहिराणी भाषेबद्दल अनेक स्वरचित कविता व गाणी सादर केली असून त्यांच्या साहित्यिक कार्याला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू म्हणजे – स्थानिक बोलीचा अभिमान आणि मराठीचा जागतिक सन्मान.त्यांच्या मते, “बोलीभाषा जपली तरच प्रमाणभाषा अधिक समृद्ध होते.”

राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव

झी २४ तासवरील सादरीकरणानंतर सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांतून ताईंना अभिनंदनाचे संदेश आले. खानदेशाच्या मातीचा सुगंध राज्यभर पोहोचविण्याचे काम त्यांनी या माध्यमातून केले, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

मराठी गौरव दिनाला साजेशी काव्यांजली

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिलाच भाषा गौरव दिन असल्याने यंदाचा उत्साह अधिकच होता. ताईंच्या कवितेतील ओळी—

“अभिजात भाषाना दर्जा भेटना मराठीले,
भरावर भरी तीनं भिडी जाई गगनले…”

भाषेचा अभिमान, संस्कृतीचा सन्मान

शिरवाडकर, अत्रे, पु.ल., विंदा, फडके, मर्ढेकर यांसारख्या साहित्यिक परंपरेचा उल्लेख करत ताईंनी मराठीच्या वैभवशाली वारशाला सलाम केला. त्यांच्या सादरीकरणाने अमळनेर शहराचा नावलौकिक वाढवला असून खानदेशाच्या बोलीला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले.
वसुंधरा ताई लांडगे यांची ही काव्यझेप केवळ वैयक्तिक यश नसून, ती मराठी आणि अहिराणी भाषेच्या गौरवाचा अभिमानास्पद क्षण ठरली आहे.
अमळनेरकरांच्या वतीने ताईंना मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *