छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेरच्या विद्यार्थ्यांचा दमदार ठसा, मास्टर करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घवघवित यश; विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
![]()
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेरच्या विद्यार्थ्यांचा दमदार ठसा
मास्टर करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घवघवित यश; विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
अमळनेर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भुसावळ येथे आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याचा लौकिक उंचावला. भुसावळ शहरातील रंगमंच हॉल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत बडोदा येथील सुशील करंदीकर यांच्या टीमने प्रथम क्रमांक पटकावत आपली ताकद सिद्ध केली. तसेच धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहराचे मास्टर अजमल शिकलीकर यांच्या टीमनेही आक्रमक आणि प्रभावी खेळ सादर करत उल्लेखनीय यश संपादन केले.
दरम्यान, अमळनेर येथील डी. आर. कन्या शाळेजवळील पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर दररोज सायंकाळी सुरू असलेल्या मास्टर करंदीकर यांच्या कराटे क्लासमधील विद्यार्थ्यांनीही स्पर्धेत चमकदार यश मिळवत सर्वांचे लक्ष वेधले. कठोर सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली.
यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
लीना संतोष पाटील, खनक अमित पवार, ऋतिका स्वप्नील पाटील, प्रणाली स्वप्नील पाटील, भूमिका विकास जाधव, तेजस्विनी विकास जाधव, आयत राहिल खान, रीषिका गुरु गोयार, रेहंस हर्षल केळे, रोशन महेंद्र चौधरी, ज्ञानेश्वर मनोज महाजन, राजवीर संदीप महाजन, अनंत निखिल वर्मा, गौरव दीपक पाटकर, समन्तक देवेंद्र देशमुख, मयूर दीपक पाटकरी, कृष्णा महेंद्र चौधरी, गणेश संदीप पाटील, प्रणव राजेंद्र पाटील, प्रशिक बाळासाहेब दोंदे, अक्षित रवि वर्मा, दुर्गेश नाना पाटील, सिद्धेश अमित पवार, साऊ सपकाळे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, मास्टर करंदीकर यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले जात आहे. या यशामुळे अमळनेरच्या क्रीडा क्षेत्राला नवी उभारी मिळाली असून भविष्यातही अशीच यशस्वी कामगिरी घडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

