प्रताप महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; डॉ. रमेश माने यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
![]()
प्रताप महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; डॉ. रमेश माने यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील मराठी विभागाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. रमेश माने आपले मत व्यक्त केले, त्यांनी मराठी भाषेचे वैभव, साहित्यपरंपरा आणि कुसुमाग्रज यांच्या साहित्यसेवेचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वि. वा. शिरवाडकर यांचे वाङ्मयीन कार्य विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कांबळे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन यातला फरक सांगितला. तसेच मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर मराठी विषयातले दर्जेदार संदर्भ ग्रंथ वाचली पाहिजेत. समाजासाठी व राष्ट्रासाठी साहित्य महत्त्वाचे आहे. साहित्य वाचल्याने प्रेरणा मिळते. वाचनसंस्कृती जोपासली तर जगणं समृद्ध होते. असे अध्यक्षीय भाषणात सांगितले. दरम्यान प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी विभागातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी विभागातील डॉ. विलास गावीत डॉ. ज्ञानसागर सूर्यवंशी आणि विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगेश पाटील यांनी केले, तर आभार प्रा. सागर सैंदाणे यांनी मानले.

