“टाळ-मृदंगाच्या गजरात अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती जल्लोषात; भव्य शोभायात्रा, रांगोळ्यांनी उजळला मिरवणूक मार्ग”
1 min read

“टाळ-मृदंगाच्या गजरात अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती जल्लोषात; भव्य शोभायात्रा, रांगोळ्यांनी उजळला मिरवणूक मार्ग”

Loading

“टाळ-मृदंगाच्या गजरात अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती जल्लोषात; भव्य शोभायात्रा, रांगोळ्यांनी उजळला मिरवणूक मार्ग”

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या
मिरवणूक मार्गावर दिपक वाल्हे अनिल वाघ रविद्र जाधव लक्ष्मण परदेशी यांनी ठिकठिकाणी सुशोभित रांगोळीच्या काढल्या.

शहरातून भव्य अशी शोभा यात्रा काढण्यात आली होती. वाडी चौक येथून गाडगे बाबा च्या पूर्णाकृती प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणुकीला उत्साहात सुरुवात करण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात, घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात संपूर्ण समाजबांधव आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाडी चौक, सराफ बाजार, दगडी दरवाजा, राष्ट्रसंत गाडगेबाबा चौक मार्गे गाडगेबाबा उद्यानापर्यंत ही मिरवणूक पार पडली. ठिकठिकाणी फुलांची उधळण करत भाविकांनी बाबांना अभिवादन केले.
राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मारकाजवळ आरती व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्रिकोणी बगीचा परिसरातील गाडगेबाबा उद्यानात सामूहिक आरतीने वातावरण भक्तिमय झाले. परदेशी धोबी समाजातर्फे महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी परीट धोबी समाज अमळनेरचे आजी-माजी पदाधिकारी, युवा परिट धोबी समाज मंडळाचे कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रा. सुभाष जिभाऊ पाटील, नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर, नगरसेवक रामकृष्ण पाटील, गोपीभाऊ कासार सुरज परदेशी जयश्री ताई अनिल पाटील, अशोक बिऱ्हाडे सर,मोहन सातपुते श्रीराम आबा चौधरी गुलाब बापु पाटील पंकज चौधरी पंकज भोई बाळासाहेब बाळासाहेब संदाशिव दिपक चौगुले नाविद शेख अविनाश जाधव विक्रांत पाटील, नाना धनगर, मनोहरनाना पाटील, अरुण देशमुख आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली.
गाडगेबाबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन स्वच्छ, सुजाण आणि सुसंस्कृत समाज घडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. भक्तीभाव, शिस्त आणि सेवाभावाचा संगम ठरलेला हा सोहळा अमळनेरकरांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *