अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…
1 min read

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

Loading

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

एरंडोल / धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

एरंडोल / धरणगांव — तालुक्यातील तळई अंतुर्ली परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा लाईट व बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करा या मागणीसाठी शिवआर्मी ग्रुप व महाराणा प्रताप युवा मंच यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंतुर्ली – तळई परिसरात अलीकडे वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. शेतात काम करतांना तसेच रात्रीच्या वेळी पाणी भरतांना शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील महिला, लहान मुले व शेतकरी बांधव यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्याच्या मुक्त वावरामुळे जीवितास धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशा आशयाचे निवेदन वनपरीक्षेत्र अधिकारी एरंडोल यांना देण्यात आले. तसेच रात्रीच्या वेळी शेतात जाऊन मोटार सुरू करणे व पिकांना पाणी देणे अत्यंत धोकादायक बनले आहे. त्यामुळे शेतीला वेळेवर पाणी देता येत नसून पिकांचे नुकसान होत आहे. शेती हाच आमचा मुख्य उदरनिर्वाहाचा आधार असल्यामुळे अशी परिस्थिती कायम राहिल्यास आमच्यावर आर्थिक संकट येऊन उपासमारीची वेळ येण्याची भीती आहे. तरी या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतीसाठी दिवसा लाईट उपलब्ध करून द्यावी यासंदर्भात उपकार्यकारी अभियंता महावितरण एरंडोल यांना निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी शिवआर्मी ग्रुपचे अध्यक्ष यशवंत खुशाल पाटील, महाराणा प्रताप युवा मंचचे अध्यक्ष विजयसिंग भीमसिंग पाटील, सुवर्णसिंग धनशिंग पाटील यांच्यासह भानुदास भावलाल पाटील, महेंद्रसिंग धरमसिंग पाटील, प्रेमराज गरबड पाटील, सुभाष प्रताप पाटील, लालसिंग हारसिंग पाटील, दिपक छगन पाटील, विशाल रावसाहेब पाटील, आकाश शांताराम मिस्तरी, होमसींग पाडुरंग पाटील, लोटन विठ्ठल पाटील, तुकाराम वेडू भिल, वाल्मीक विक्रम पाटील, विनोद फकीरा नाईक, ओम बापू पाटील, जयवीर पाटील, धनसिंग मानसिंग पाटील, सुमेरसिंग मानसिंग पाटील, तुषार आबा बाविस्कर, प्रविण अशोक घोडेस्वार, लोटन भावसिंग पाटील, निलेश लोटन पाटील, ज्ञानेश्वर बाळू पाटील, छोटू मानसिंग पाटील, दिवानसिंग प्रताप पाटील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *