दुर्बीनलायी दखेल बा,तथागता* (अहिरानी लिखायीनीं समीक्षा, संपादक प्रा.वा.ना.आंधळे)
![]()
*दुर्बीनलायी दखेल बा,तथागता*
(अहिरानी लिखायीनीं समीक्षा, संपादक प्रा.वा.ना.आंधळे)
… नानाभाऊ माळी
पिढ्यानं पिढ्या मांगे ग्यात,दिन जायी ऱ्हायन्यात.काय बदलतं ग्या,आखो बदली ऱ्हायना!मानसे बदली ग्यात,तशा डोया बदली ग्यात! मव्हरे बदली ऱ्हायनात!बुद्धीतून कस लायी उगयेल चंदन थंडक देत ऱ्हास.नजरा तपाशी तुपाशी सूर्य, चंदर,धरतीलें दखी कस लायेतं ग्यात!त्या त्याचं सेतस,तठेचं सेतंस जागावरतून अजिबात हालनात नही. बा,तथागता तोचं सें, तठेचं सें! इदन्यानन्हा पक्का पायावर हुभा बा, तथागता तठेचं सें.त्यान्हा त्याग, त्यान्ह चरित्तर तेचं सें.सच से.दुखलें नेवनेटकं खांदवर लीस्नी, दुःखम्हा सुख धुंडी नवा डोयातून तेचं जुनं तपासी दखानं चालू से.तपासेल उजयी ऱ्हायनं.सोनाथून पिव्वेधमक व्हयी ऱ्हायनं.तपासनारा खंदी खंदी खल्ली खोल भिडी ऱ्हायनात,तय पावूतं भिडी ऱ्हायनात!बा,तथागतानं जलम ते निर्वानपावूत बठ्ठ चरितर धुंडी,तपासी दखी ऱ्हायनात.डोया काढेल नव्वी नजरतून दखी ऱ्हायनात.कव्वी ताजी नजरतून खंगायी खुंगांयी तपाशी ऱ्हायनात. दुर्बीन लायी दखनारा, तपासनारा बठ्ठा इद्या उकयी उकयी पेयेल सुरामरद सेतस.त्यास्ना बुद्धीम्हा इदन्यानन्ह भरेल मोठं डबोलं सें.बा, तथागता तठेचं हुभा से!बा, तथागता इदन्यानन्हा पाया से!…. 💐
बा, तथागता!… सिद्धार्थ ते बुद्ध सत तत्वग्यानन्ह जीवन परवास से!कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र इद्यापीठन्हा मुकाडदम डाक्टर म.सू. पगारे सर यासन्हा मराठी लिखायीतून हायी *लांबीलचक* कविता नेम्मन मोती पह्येरत जास.मानोस्लें सदग्यानी जीवन चरित,उजाये दखाडानं काम करस.परकास दखाडानं काम करस. सांग्र्या डांग्र्यास्नी रचेल कुंभाडलें नकारत ऱ्हास.बा,तथागता हायी आल्लग नावनिव्हायंनीं कविता से. खरबेल आमरूद से.ती बुद्धी अग्यानीं,आंध्यास्लें डोया देवानं काम करस.मुक्या,बहिऱ्यास्लें जीभ,कान देवानं काम करस.जपेलस्लें जागे करस!पडमत लेयंलस्लें दनकारस, कव्हयं ग्यानटकोरा देवानं काम भी करस!सुवास दडपायेलस्लें, गुदमरायेंलस्लें भाहेर व्हडीकाडी मोकी चोकी सूद हवा देवानं काम करस.बा,तथागता ८-९ भाषास्मझार परकाशित व्हयनी तव्हयं ग्यानन्हा तराजूम्हा भू भारी वजनी व्हतं गयी!
बा, तथागता या लांबीलचक कवितालें अहिरानी भाषाम्हा लिखायी करी परकाशित करानं काम करेल से आदरणीय प्रा. वा. नां. आंधळे.अहिरानीम्हा दर २० किलोमीटर आंतर पार करावर भाषान्हा लहेजा बदली जास. धुये,जयगाव, नंदुरबार, नासिक (कसमादे पट्टा) या बठ्ठास्ना हिरदना तयपावूत भिडनारा गोडवा दि जास. अहिरानीबोली भाषा आसी लिखानं म्हणजे फफोटाम्हा पडानं काम व्हतं. प्रा. वा.ना.आंधळे सर फफोटा चोपडी लिखत ऱ्हायनात.भवडत ऱ्हायनात. लिखता लिखता अस्सल अहिरानी भाषानां पुरणपोयीं गोडवा लिखत ग्यात.अहिरानीं भाषा ग्यानीस्नी बादलीभर खरबेल सबददूध आंधळे सरस्ना आंगवर टाकी फफोटा धोयी टाका. *अहिरानी भाषा ग्यानी* असा गौरव कऱीस्नी अहिरानी बा, तथागतालें साहित्यांना साधू-मुनी-भिक्कू करी टाका.कवी बुद्धनंसंगे बोली ऱ्हायना.अत्त दिप भव सांगी या लांबी कवितालें नेम्मन भाषिक मोजमापम्हझार बसाडस. आर्थनां पंधा आन पलो धरी लिखायी व्हयेल से. प्रा.वा. ना.आंधळे सरसनी अहिरानी लिखायी सबद पंधाधरी कायेजलें भिडत ऱ्हासं.अहिरानी शबदफुले कायेजलें थंडक देत ऱ्हासं. बा, तथगतान्हा जलमफाइन ते निब्बान निर्वानपावूत दुखले जिकी आमरूद व्हयी जास.💐
डॉ. म. सू. पगारे सर बा, तथागतालें डोयांमव्हरेतून हालू देतसं नही.दुखन्हा गोमडा अग्यानींपनम्हा से हायी सांगी जातंस.अहिरानी लिखायीतून प्रा. वा ना. आंधळे सरस्नी बा,तथागता न्यामिना परवास मांडेल से.अहिरानी लिखायी कशी व्हयनी? यांगुतां मोके चोके दार हुगाडी बठेल व्हतात.न्यूतं दि बलायेंल व्हतं न्यूत देवांयेंलें रोकडं सांगेलं व्हतं,*’या..तपासी तुपासी परीक्षा करा!परीक्षण करा. समीक्षा करा!चांगलं वाईट जे व्हयी ते लिखी धाडा!दुर्बीन लायी सबद सबद धुंडी, वयखी -चाफली चुफली कवितानं मोल ठरावां!’* बा तथागतावर एक नही, दोन नही ते तद्दनं २३ तपासनीसस्नी *ज्याले कविता जशी वाटनी तशी* त्या हिरदना बोल लिखी धाडा व्हतात. बा, तथागता या लांबीलच्चक कविताले सबद वजनी काटावर ठीस्नी लिखनारा मोक्या व्हयी गयतात.💐
तराजूनं तागडं मोलनागंम झुकतं ऱ्हायनं.दर्जा ठरावत ग्यात. प्रा. वा. ना.आंधळे सरस्नी बठ्ठा समीक्षकस्लें आयतवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ नां दिन जयगाव जिल्हानां *एरंडोललें बालायेंलं व्हतं. ‘अहिरानी भाषांनी लिखायीतून ‘ बा, तथागतावर लिखेल २३ समीक्षकस्ना समीक्षा ग्रंथनं परकाशनलें बलायेंल व्हतं. समीक्षा ग्रंथनं संपादनं सोता प्रा. वा. ना. आंधळे सर यास्नी करेल से.* हावू अहिरानी भाषाम्हा नव्वा चमत्कार से.अहिरानीम्हा लिखेल बा,तथागता हायी लांबीलाचक कवितावर २३ साहित्यिकस्नी समीक्षा लिखेल ग्रंथनं परकाशन उजाये देत गये.*तोंडम्हा आमरुद, लिखायीम्हा गोडवा ऱ्हायना का लिखायी जित्ती व्हयी जास.*
मी पुनाथून नींघी काही कामगर्जे जयगावलें थांबनू व्हतु.मित्रांना पोरन्ह लगीन व्हतं.दुसरादिन हेट्या दिन उगी ऱ्हायंता.सूर्यदेवनं दर्शन व्हयी ऱ्हायंत.मी जयगावतून एरंडोललें जायी भिडनू. तठे अहिरानी मायन्हा मोठ्ठल्ला नावकारी येल व्हतात.लाल येल व्हतात.गंजज अहिरानी मायनां पालखीना भोई येल व्हतात.कोन पी.एच.डी डाक्टर व्हतात.कोन प्रोफेसर ते कोनी इंजिनियर व्हतं.बा, तथागतावर कायेजतून लिखेल व्हतं. त्या बठ्ठा मोठ्ठला लोकेस्मझारं मी धाकला हाजर व्हतु.समीक्षा ग्रंथना परकासनंलें दर्दीस्नी गर्दी व्हयेलं व्हती.समीक्षा ग्रंथनं परकासन व्हयी ऱ्हायंतं.*ज्यास्ना डोकाम्हा बा, तथागता उतरेल व्हतात, परकास व्हयी हुभा व्हता.. मूळ लेखक आदरणीय डॉक्टर म. सू.पगारे सर येल व्हतात.* बुद्ध तत्वग्यानी येल व्हतात.💐
अहिरानी लिखायी ज्यासना डोकातून उतरनीं, सबद सबद नेम्मन पह्येरी बा, तथागतानां तपासेल जोजार मांडा त्या आदरणीय प्रा. वा. नां आंधळे सर यासन कस्ट दखी सुकून वाटी ऱ्हायंत.बा, तथागतालें शांती,समता,इदन्यान प्यारं व्हतं. कितलं भी घसडी धोये तरी सदवीचार धवावनार नहीत आसं सत्य मव्हरे ठेयेलं व्हतं.अहिरानी लिखायीतून बा, तथागता भूत, वर्तमान आन भविष्यलें नेम्मन न्यावं दि आसा से.तो निरानाम बदलावू नही आसं लिखायेलं से.अहिरानी समीक्षाग्रंथ नेम्मन न्याव देवानं काम करी.तत्वग्यान साधं,सोपं करी उलगडानं काम करी असा भरोसा से!
💐💐💐💐🌹💐💐💐💐
****************************
… नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु. हडपसर,पुणे)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२२ फेब्रुवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com

