समत्वभाव जपला तर जगातलं कोणतंही यश अशक्य नाही….अॕड रामेश्वर ठाकरे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५४ वा विचार मंथन मेळावा संपन्न* *पुरस्कार व ओळखपत्र वितरण ,गाथा रमाईची” पुस्तकाचे प्रकाशन* *गजानन सोमाणी,अनिल मावळे,कैलास टकोरे,गजानन थोरात,बुढन गाडेकर,दिपक शिरसाट,संघपाल शिरसाट पुरस्कारांनी सन्मानित*
![]()
*समत्वभाव जपला तर जगातलं कोणतंही यश अशक्य नाही….अॕड रामेश्वर ठाकरे*
*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५४ वा विचार मंथन मेळावा संपन्न* *पुरस्कार व ओळखपत्र वितरण ,गाथा रमाईची” पुस्तकाचे प्रकाशन*
*गजानन सोमाणी,अनिल मावळे,कैलास टकोरे,गजानन थोरात,बुढन गाडेकर,दिपक शिरसाट,संघपाल शिरसाट पुरस्कारांनी सन्मानित*
*विविध बळींना व स्व.पुष्पाताई मानकर यांना सामुहिक श्रध्दांजली*
*अकोला-* जात,धर्म,पंथ,भाषा,अशा विविध भेदभावांना तिलांजली देऊन सामाजिक क्षेत्रात समत्वभाव जपून केली जाणारे मानवसेवी कार्य करणारांना जगातलं कोणतंही यश मिळवणं अशक्य नाही.अशा पध्दतीने वाटचाल करणारांना जगातली कोणतीही शक्ती हरवू शकत नाही.असे प्रतिपादन अकोल्यातील राजराजेश्वर मंदिराचे अध्यक्ष अॕड.रामेश्वर ठाकरे यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून सुरू असलेल्या पत्रकार आणि सामाजिक कल्याणाच्या भेदभावविरहीत वाटचालीशी या वास्तव सत्याची तुलना करतांना ते प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सौ.जया भारती यांची,तर लोकस्वातंत्र्यचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,प्रा.डॉ.संतोषभाऊ हुशे,पत्रकार निशाली पंचगाम,अॕड.प्रजानंद उपर्वट यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.सौ.जया भारती यांनी पत्रकारिता हा एक छंद आहे.तो जोपासतांना बातम्यातील सत्त्यता सांभाळून विश्वासपात्र पत्रकारिता व्हावी अशी अपेक्षा अध्यक्षिय मनोगतातून व्यक्त केली.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५४ वा मासिक विचारमंथन मेळावा स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे संपन्न झाला.यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे बाबा तथा महापुरूषांना वंदन अभिवादन व विविध बळींना,त्याचप्रमाणे स्व. पुष्पाताई देवलाल मानकर यांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.ज्येष्ठ पत्रकार गजानन सोमाणी यांना “लोकस्वातंत्र्य पत्रकार भुषण सेवा गौरव” तर अनिल मावळे,बुढन गाडेकर,कैलास टकोरे,दिपक शिरसाट,संघपाल शिरसाट यांना प्रभावी पत्रकारिता गौरव पुरस्कारांनी आणि गजानन थोरात व दिलीप नवले यांना सामाजिक सेवा गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.उपस्थित अथितींचेही सन्मान करण्यात आले.सौ.सोनाली मोरे, सौ.पुजा काळे,व देवानंद ढोरे,या सभासदांना ओळखपत्रं देण्यात आली.
याप्रसंगी पंजाबराव वर लिखित “गाथा रमाईची” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.अॕड.प्रजानंद उपर्वट यांनी त्यावरील समिक्षणात्मक अंतरंग मनोगतातून व्यक्त केले.गजानन सोमाणी यांनी अकोल्यातील पत्रकारितेचा ईतिहास विषद केला.संजय देशमुख यांनी संघटनेची वाटचाल आणि अधिक यशासाठी निरंतर सक्रियतेच्या अपेक्षा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदिप खाडे, कादंबरीकार पुष्पराज गावंडे,ग्राहक मंच न्यायाधिश नितीन अग्रवाल, अॕड नितीन धुत,अंबादास तल्हार,संदिप देशमुख, विनय दांदळे,अॕड मनोज अग्रवाल, प्रा.मोहन काळे,अनिल मावळे,मनोज देशमुख,शामराव देशमुख, सुरेश तिडके,जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर,अनिल मावळे, गजानन घोंगे,गजानन थोरात,आशिष वानखडे,जिल्हा सचिव मनोहर मोहोड,बुढन गाडेकर,रमेश समुद्रे,अमित इंगळे,दिलीप नवले,सौ.सोनाली मोरे,वसंतराव देशमुख,प्रा.सुरेश कुलकर्णी,एकनाथ पाखरे,विजयराव बाहकर,कैलास टकोरे,डॉ.अशोक शिरसाट,अॕड संकेत देशमुख,देवीदास घोरळ,सुरेश पाचकवडे, नरेन्द्र देशमुख,डॉ.गौरव देशमुख,दिपक शिरसाट,फुलचंद वानखडे,रविंद्र देशमुख,शिवचरण डोंगरे,सुरेश भारती, सोनकुसरेसाहेब, वसंत नकासकर,नारायण वाडेकर, चेतन थोरात,वासुदेव थोरात,अर्जून घुगे,प्रवीण वानखडे,गजानन चव्हाण,सतिश देशमुख,आकाश हरणे, पि.एल. जामोदे,शिवचरण डोंगरे,गजानन मुऱ्हे,संघपाल शिरसाट,कृष्णा चव्हाण, सिध्दार्थ तायडे,यशवंत शिंदे, व अनेक पत्रकार उपस्थित होते.संचलन प्रा.महादेव लूले तर आभारप्रदर्शन पुष्पराज गावंडे यांनी केले.सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

