शिवशाही स्वयंसहायता गटाचा वर्धापन दिन आणि शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी*
![]()
*शिवशाही स्वयंसहायता गटाचा वर्धापन दिन आणि शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी*
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर मुंदडा इस्टेट गलवाडे रोड ‘शिवशाही स्वयंसहायता गटाचा’ वर्धापन दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली.*
*या कार्यक्रमाची सुरुवात गटाचे अध्यक्ष श्री.भारत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी गटाच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला. वर्धापन दिनानिमित्त गटाच्या गेल्या वर्षातील कामाचा आढावा घेण्यात आला आणि आगामी काळातील उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.*
*कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवर श्री.संदीप पाटील यांनी महाराजांची जयंती कशाप्रकारे साजरी करण्यात यावी आणि स्वयंसहायता गटांचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. “शिवशाही गटाने गेल्या एक वर्षांत केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत,” असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.*
*या सोहळ्यासाठी गटाचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सर्व सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक शिवगर्जना देवून करण्यात आला.*

