कापडणे गावात महात्मा फुले स्थापित सत्यशोधक समाजोक्त पध्दतीने विधी*….
![]()
*कापडणे गावात महात्मा फुले स्थापित सत्यशोधक समाजोक्त पध्दतीने विधी*….
आज दिनांक १६फेब्रुवारी २०२६ रोजी कापडणे ता. जि. धुळे येथील रहिवाशी प्रा.दिनकर सदाशिवराव माळी (खलाणे)सर यांच्या मातोश्री स्मृतीशेष कै. सुंदरबाई सदाशिवराव माळी माजी.उपसभापती (विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कापडणे )यांचा वर्ष श्राद्ध विधी महात्मा जोतीराव फुले स्थापित सत्यशोधक समाजोक्त पद्धतीने झाला हा विधी सत्यधर्मीय विधीकर्ते राजकिशोर तायडे यांनी केला याप्रसंगी शेतकरी शेतमजूर वेठबिगारी कष्टकरी कामगार समाज बांधवांचे दैवत विठुराया, बळीराजा यांच्या सोबतच खलाणे परिवाराचे कुळदैवत पाचपावली माता ,पहिल्या सत्यशोधिका आईसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीमाई, छत्रपती शाहू महाराज ,डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी महामानव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
☄️ सत्यशोधक संघाचे विधिकर्ते माननीय राजकिशोर तायडे सर ( महाराष्ट्र राज्य)यांनी हा विधी संपन्न केला तसेच या विधीमध्ये आपली मूळ संस्कृती स्त्रीसत्ताक मधल्या *सातीआसरा व तसेच कृषी संस्कृतीचा बळीराजा* या सर्वांच्या कार्याची ऐतिहासिक संस्कृतीची माहिती सांगितली .आपण हजारो वर्षापासून आपली संस्कृती जोपासत आहोत पण ती का जोपासतो तीचे का आचरण करतो या सर्वांचा उलगडा केला त्यांनी महात्मा फुले यांनी दिलेला मूळ सांस्कृतिक मार्ग का महत्त्वाचा आहे? या संदर्भात प्रबोधन केले हे प्रबोधन करताना त्यांनी खास करून भटजी ग्रहाची भीती दाखवून बहुजन समाजाला विविध धार्मिक विधीच्या मार्गाने अज्ञानाचा फायदा घेऊन आर्थिक लुबाडणूक कशा प्रकारे करतो हे समजावून सांगितले तसेच घटस्थापना,वीर नाचविणे, शेंडी उतरविणे, जावूळ काढणे, ड्युट्या बुधल्या, खंडोबाचा तळी उचलणे, कानबाई माता उत्सव या धार्मिक कार्यासाठी भटजीची आवश्यकता नसते तर मग लग्न,दशक्रियासाठी भटजीला का म्हणून बोलवावे? म्हणूनच राष्ट्रपिता जोतीफुले यांनी सांगितले की,आमचे विधी आम्ही करू म्हणूनच त्यांनी सार्वजनिक सत्यधर्मीय पद्धतीने विधी कसे करावे हे समजावून सांगितले व त्याची पुस्तिका काढली याच मार्गावर सत्यशोधक समाज संघाने सुद्धा त्या पुस्तिका समाजाचे पैसे वाचावे यासाठीच छापलेल्या आहेत कि त्या पुस्तकांच्या आधारे शेतकरी, कष्टकरी समाजाने आपले धार्मिक विधी घरच्या घरी करावेत,मध्यस्थीला बोलावण्याची आवश्यकता नाही. याप्रसंगी महात्मा फुले यांनी लिहिलेल्या सत्यधर्माच्या अखंडाचे सामूहिक गायन झाले. दिनकर माळी सर ,सागर खलाणे, चंद्रशेखर खलाणे यांच्या नातेवाईक मित्रपरिवार या सर्वांनी या विधी बद्दल संतोष व्यक्त केला व भविष्यात असेच विधी आम्ही करू अशी प्रतिज्ञा सुद्धा घेतली.

