माझा संकल्प- भूमी सुपोषण’ चळवळीसाठी अमळनेरला बुधवारी भव्य महाशोभायात्रा अक्षय कृषी परिवार, मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे उपस्थितीचे आवाहन
![]()
‘माझा संकल्प- भूमी सुपोषण’ चळवळीसाठी
अमळनेरला बुधवारी भव्य महाशोभायात्रा
अक्षय कृषी परिवार, मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे उपस्थितीचे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी
कृषी क्षेत्रातील अग्रगण्य सेवाभावी संस्था अक्षय कृषी परिवार व येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे माझा संकल्प- भूमी सुपोषण चळवळीसाठी जनजागर व्हावा, यासाठी बुधवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी भव्य महाशोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक व अभूतपूर्व होणाऱ्या या महाशोभायात्रेचे अमळनेरकरांनी साक्षीदार व्हावे, असे आवाहन अक्षय कृषी परिवार व श्री मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
महाशोभायात्रा सुरू होण्यापूर्वी सर्वांना पोटभर नाश्ता दिला जाणार आहे. महाशोभायात्रा मार्गावरही ठिकठिकाणी गोळ्या- बिस्किटे, हलका- फुलका नाश्ता व जलपानाची व्यवस्था केली जाणार आहे. सर्व शाळा- महाविद्यालये, विद्यार्थी- विद्यार्थिनी, विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व महिला संघटनांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अक्षय कृषी परिवार व श्री मंगळग्रह सेवा संस्थेने केले आहे.
चौकट……..
महाशोभायात्रा प्रारंभ, स्थळ व मार्ग
बुधवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थान येथून महाशोभायात्रेस प्रारंभ होईल. संतश्री सखाराम महाराजांची वाडी- सराफ बाजार- कोंबडी बाजार- हॉटेल पायल- राणी लक्ष्मीबाई चौक- मोठा बाजार- दगडी दरवाजा- फरशी रोडमार्गे श्री मंगळग्रह मंदिरात महाशोभायात्रेची सांगता होईल. (मंदिरात महाशोभायात्रेतील सहभागींसाठी भोजन व्यवस्था आहे.)

