अमळनेरच्या संगणक शिक्षणाला दिशा देणारे राजेंद्र भावसार
1 min read

अमळनेरच्या संगणक शिक्षणाला दिशा देणारे राजेंद्र भावसार

Loading

अमळनेरच्या संगणक शिक्षणाला दिशा देणारे राजेंद्र भावसार

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यात संगणक शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणारे, पंकज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक आदरणीय श्री. राजेंद्र भावसार सर यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. शिक्षणक्षेत्रात त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण, निस्वार्थ कार्यामुळे त्यांचे नाव आज अमळनेरमध्ये विश्वासाचे प्रतीक बनले आहे.
साधेपणा, मितभाषी स्वभाव आणि अभ्यासू वृत्ती ही त्यांची खरी ओळख आहे. विद्यार्थ्यांना केवळ संगणकाचे तांत्रिक ज्ञान देणे एवढ्यावरच न थांबता, बारावीनंतर कोणते कोर्स निवडावेत, करिअरच्या कोणत्या वाटा उपलब्ध आहेत, स्पर्धा परीक्षांसाठी कशी तयारी करावी याबाबतही ते मार्गदर्शन करतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली आहे.
पंकज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये बारावीनंतर विविध संगणक अभ्यासक्रम उपलब्ध असून एमएस-सीआयटी (MSCIT) कोर्स, कॉम्प्युटर बेसिक नॉलेज, तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले जात आहे. आजही अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगणकाचे धडे गिरवत आहेत. “स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर भावसार सर” असे समीकरण विद्यार्थ्यांमध्ये रूढ झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना घडवले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले विद्यार्थी आज विविध शासकीय, खासगी तसेच उद्योग क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. हीच यशस्वी पिढी त्यांच्या कार्याची खरी ओळख ठरली आहे.
त्यांच्या कुटुंबीयांचाही शैक्षणिक क्षेत्रात मोठा वाटा असून त्यांच्या मोठ्या भावांनी टायपिंग प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला आहे. अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.
नेहमीच मदतीस तत्पर राहणारे, सकारात्मक दृष्टिकोन जपणारे आणि विद्यार्थ्यांप्रती आत्मीयता बाळगणारे भावसार सर हे केवळ शिक्षक नसून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक, मित्र आणि प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या कार्यामुळे अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे.
यासोबतच भावसार सर यांची सामाजिक बांधिलकीही उल्लेखनीय आहे. साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालय येथे कार्यरत असलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार सर यांनाही विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांसाठी तसेच स्पर्धा परीक्षा वर्गांसाठी ते नेहमीच सहकार्याचा हात देतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य सुविधा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी ते सातत्याने पुढाकार घेत असतात. शिक्षणासोबत समाजकार्याची जाणीव जपणारे असे नेतृत्व म्हणजेच राजेंद्र भावसार, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवर, माजी विद्यार्थी आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि कार्याला अधिकाधिक यश लाभो, अशा सदिच्छा व्यक्त होत आहेत.

 

सरजी
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगताना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

🎂💐💐💐💐💐

ईश्वर आर महाजन पत्रकार अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *