डोंबिवली भारत स्काऊटस् आणि गाईड्स स्थानिक संस्थेचा “चिंतन दिन ” बक्षीस समारंभ संपन्न.   रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभागाचे स्काऊट गाईड साठी मोलाचे योगदान:-अशोक जगताप.
1 min read

डोंबिवली भारत स्काऊटस् आणि गाईड्स स्थानिक संस्थेचा “चिंतन दिन ” बक्षीस समारंभ संपन्न. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभागाचे स्काऊट गाईड साठी मोलाचे योगदान:-अशोक जगताप.

Loading

डोंबिवली भारत स्काऊटस् आणि गाईड्स स्थानिक संस्थेचा
“चिंतन दिन ” बक्षीस समारंभ संपन्न.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभागाचे स्काऊट गाईड साठी मोलाचे योगदान:-अशोक जगताप.

 

ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी)
ठाणे भारत स्काउट्स आणि गाईड्स ठाणे संलग्न
डोंबिवली भारत स्काऊटस् आणि गाईड्स स्थानिक संस्था व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चिंतन दिन बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्थानिक संस्थेचे उपाध्यक्ष श्री एकनाथ चौधरी सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईड्स स्थानिक संस्थेतर्फे तोंडी स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात केली.या कार्यक्रमासाठी
डोंबिवली युवक एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री वनिल शाह, संचालिका सौ पूजा शाह, मुख्यध्यापिका डॉ.राखी सिंग,
शिक्षक प्रमुख अनुराधा जैन.
रोटरी क्लब चे पदाधिकारी दिलीप अष्टेकर
रो. दिनेश खरोटे सचिव,
जिल्हा गाईड संघटक सौ .हेमांगी पाटील मॅडम,संतोष दुसाने,
संजय थोरात ,
अंकुर आहेर कार्याध्यक्ष अशोक जगताप
जगदीश उगले,राजेंद्र शेटे,
श्री गोपाळ सूर्यवंशी,
एकनाथ चौधरी,
प्रविण खाडे,
प्रा.उदय नाईक या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम सरस्वती पूजन लॉर्ड बेडन पॉवेल, लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले व स्काऊट गाईड प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचा डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईड्स स्थानिक संस्थेतर्फे सन्मानचिन्ह , शॉल,गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री अशोक जगताप सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व डोंबिवलीतील सर्व शाळा, मुख्याध्यापक, स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन यांनी वर्षभरामध्ये स्थानिक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले व संपूर्ण वर्षांच्या कार्यक्रमाचे आयोजन कसे केले जाते याबाबत आपला अहवाल सादर केला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिव श्री जगदीश उगले, उपाध्यक्ष श्री एकनाथ चौधरी यांनी केले. सल्लागार नरेंद्र राणे यांनी स्काऊट गाईडच्या विविध क्लप घेऊन विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.
सालाबादप्रमाणे यावर्षी देखील डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्था व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने *आदर्श स्काऊट मास्टर पुरस्कार कै.भा .स .मंत्री यांच्या स्मृती प्रित्यर्थ*
श्री गेंदालाल विठोबा गांगुर्डे स है जोंधळे विद्यामंदिर मराठी माध्यमिक विभाग डोंबिवली ,श्री सूर्यकांत खंडेराव पवार साउथ इंडियन असोसिएशन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज डोंबिवली पश्चिम
आदर्श गाईड कॅप्टन पुरस्कार कै सुरेंद्र बाजपेयी सर यांच्या स्मृति प्रित्यर्थ*
सौ लीना अनिल शिंपी एस एच जोंधळे विद्यामंदिर गुजराती माध्यमिक विभाग डोंबिवली,
सौ. वैशाली प्रदीप शिंदे
जन गण मन विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज डोंबिवली त्यांचा सन्मान करण्यात आला.
त्यानंतर स्थानिक संस्थेतर्फे
संजय थोरात गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मुरबाड , सौ. हेमांगी पाटील मॅडम उत्कृष्ट संघटक ठाणे जिल्हा,संतोष दुसाने उत्कृष्ट माजी जिल्हा संघटक ठाणे,
श्री. सुरेश लोहार उत्कृष्ट लीडर ट्रेनर स्काऊट विभाग,
श्री जीवन मटके उत्कृष्ट लीडर ट्रेनर कब विभाग या मान्यवरांचा सन्मानचिन्ह, शाल व गुलाबपुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
त्यानंतर डोंबिवलीतील खालील *सेवानिवृत्त मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक*
श्री भाऊसाहेब नाथा कोळेकर
सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक स. है जोंधळे विद्यामंदिर मराठी माध्यमिक विभाग डोंबिवली पूर्व, श्री सुरेश बोरसे सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यामंदिर डोंबिवली पूर्व ,सौ मुग्धा साळुंखे सेवानिवृत्त मुख्याध्यापिका टिळक नगर विद्यामंदिर डोंबिवली पूर्व,
अशोक जगताप
सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली या मान्यवरांचा सन्मानचिन्ह , शाल,गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.त्यानंतर
खालील *वार्षिक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या शाळेचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान* करण्यात आला
जन गण मन विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, स्काऊट गाईड कार्यशाळा 2025/2026,
डी. एन सी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज डोंबिवली वृक्षदिंडी व रक्षाबंधन,
टिळकनगर विद्यामंदिर स्काऊट आणि गाईड राज्यपुरस्कर शिबिर ,शिवाई बालक मंदिर संघनायक शिबिर स्काऊट आणि गाईड, प्रकाश विद्यालय कब बुलबुल मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम आणि बँड स्पर्धा आयोजन.

रॉयल इंटरनॅशनल स्कूल चिंतन दिन बक्षीस वितरण समारंभ
त्यानंतर राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थी सन 2024 /25 जे.के पाटील इंग्लिश मीडियम स्कूल च्या 8 स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांचा मेडल देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर
स्काऊट गाईड पथक नोंदणी मध्ये
प्रथम क्रमांक ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय क्रमांक रॉयल इंटरनॅशनल स्कूल, तृतीय क्रमाक स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,साऊथ इंडियन असोसिएशन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, मंजुनाथ इंग्लिश मीडियम स्कूल
कब बुलबुल पथक नोंदणी मध्ये
प्रथम क्रमांक शिवाई बालक मंदिर डोंबिवली पूर्व,द्वितीय क्रमांक एस. के. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल,तृतीय क्रमांक जी इ आय एस प्राथमिक विद्यालय डोंबिवली पूर्व, जे के पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भोपर डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र विद्यालय मराठी माध्यम डोंबिवली पूर्व
*बनी टमटोला पथक नोंदणी*
प्रथम क्रमांक दादासाहेब एम के वाणी प्राथमिक विद्यालय डोंबिवली पूर्व,द्वितीय क्रमांक शिवाई बालक मंदिर,
तृतीय क्रमांक एस. के पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल डोंबिवली पूर्व
*तंबू व गॅझेट स्पर्धा 2026*
प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी विद्यालय डोंबिवली पश्चिम,द्वितीय क्रमांक ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली पूर्व तृतीय क्रमांक मंजुनाथ इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली, पूर्व,उत्तेजनार्थ म्हणून शिवाई बालक मंदिर डोंबिवली पूर्व
मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली पूर्व
उत्तेजनार्थ म्हणून डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली पश्चिम,रॉयल इंटरनॅशनल स्कूल डोंबिवली पूर्व
*संचलन स्पर्धा 2026*
प्रथम क्रमांक रॉयल इंटरनॅशनल स्कूल डोंबिवली पूर्व,द्वितीय क्रमांक ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली पूर्व,तृतीय क्रमांक शिवाई बालक मंदिर डोंबिवली पूर्व,
उत्तेजनार्थ मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली पूर्व,
डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली
उत्तेजनार्थ प्रकाश विद्यालय डोंबिवली पूर्व
ज्ञानेश्वरी विद्यालय डोंबिवली पश्चिम उत्तेजनार्थ म्हणून बक्षीस देण्यात आले.
बँड स्पर्धा 2026 प्रथम क्रमांक डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली पूर्व
द्वितीय क्रमांक ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली पूर्व
शिवाई बालक मंदिर डोंबिवली पूर्व, मंजुनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल
बँड स्पर्धेत डी एन सी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज डोंबिवली
*सामूहिक नृत्य स्पर्धा 2026*
*स्काऊट गाईड विभाग*
प्रथम क्रमांक ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल
द्वितीय क्रमांक रॉयल इंटरनॅशनल स्कूल
तृतीय क्रमांक मंजुनाथ इंग्लिश मीडियम स्कूल, उत्तेजनार्थ:-स. है जोंधळे विद्यामंदिर गुजराती माध्यमिक विभाग डोंबिवली स. है. जोंधळे विद्यामंदिर इंग्रजी प्राथमिक विभाग डोंबिवली
कब बुलबुल विभाग प्रथम क्रमांक शिवाई बालक मंदिर डोंबिवली पूर्व, द्वितीय क्रमां जे के पाटील इंग्लिश मीडियम स्कूल गणपती वंदना
तृतीय क्रमांक जे के पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल
खरी कमाई मध्ये
प्रथम क्रमांक ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल डोंबिवली पूर्व ,द्वितीय क्रमांका रॉयल इंटरनॅशनल स्कूल डोंबिवली पूर्व, तृतीय क्रमांक
उत्तेजनार्थ म्हणून स. है. जोंधळे विद्यामंदिर इंग्लिश मीडियम प्राथमिक विभाग डोंबिवली,
एस के पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, ज्ञानेश्वरी विद्यालय डोंबिवली यांना देण्यात आले.
*स्काऊट गाईड खरी कामाई वैयक्तिक पारितोषिक*
ओमकार इंग्लिश मिडीयम स्कूल,स.है.जोंधळे विद्यामंदिर इंग्रजी प्राथमिक विभाग ,मॉडेल इंग्लिश स्कूल,रॉयल इंटरनॅशनल स्कूल,एस के पाटील इंग्लिश मीडियम स्कूल चा विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सौ हेमांगी पाटील मॅडम जिल्हा संघटक गाईड ठाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईड स्थानिक संस्थेचे कौतुक केले व स्थानिक संस्था वर्षभरामध्ये स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात त्याबद्दल स्थानिक संस्थेचे अभिनंदन केले व पुढील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर माजी जिल्हा संघटक श्री दुसाने सर यांनी डोंबिवली भारत स्काऊट गाईड संस्थेचे मन भरून कौतुक केले व स्थानिक संस्था गेली अनेक वर्षापासून स्काऊट गाईड साठी कार्यरत आहे. कै. सुरेंद्र बाजपेयी सरांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक संस्थेने अनेक राज्य पुरस्कार,राष्ट्रपती पुरस्कार स्काऊट, गाईड घडविले आहे आजही डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेतर्फे अनेक विद्यार्थी राज्य पुरस्कारासाठी आपली नोंदणी करत असतात यापुढेही त्यांनी अशीच नोंदणी करावी व स्काऊट गाईडचा व डोंबिवली स्थानिक संस्थेचा मान सन्मान वाढवावा अशा शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर श्री संजय थोरात साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मुरबाड यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडच्या माध्यमातून जीवन कसे जगावे स्पर्धा परीक्षां बाबत व विविध कौशल्य आत्मसात करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व मोलाचा सल्ला दिला तसेच स्थानिक संस्थेला कार्यक्रम आयोजनाबाबत शुभेच्छा दिल्या.
प्रा.उदय नाईक यांनी 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार असून यामध्ये नारी शक्ती हा उपक्रम हाती घेतला असून डोंबिवलीमध्ये दहा हजार मुलींचे लेझीम होणार असून त्याबाबत सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, स्काऊट मास्टर ,गाईड कॅप्टन ,संस्था चालक यांना आव्हान केले व सर्व शाळांना सहभागी विद्यार्थ्यांप्रमाणे लेझीम देण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी लेझीम प्रशिक्षणाचे कल्याण व डोंबिवली येथे आयोजन करण्यात आले असून त्याबाबत प्रत्येक शाळेला परिपत्रक देण्यात आले असून, परिपत्रक वाटपाचे काम सुरू आहे तरी सर्व शाळांनी सहभाग घ्यावा अशी विनंती करण्यात आली.
*या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. राखी सिंग मुख्याध्यापिका रॉयल इंटरनॅशनल स्कूल यांनी केले.*
संपूर्ण कार्यक्रमात ट्रॉफी व्यवस्थितपणे देण्याचे काम हरित मेहता, विराज गवळी,अशोक शेणवी, निर्मला बागल मॅडम यांनी उत्कृष्टपणे केले.
तसेच या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची शिस्त,अल्पोपहार वाटप श्री केतन सर ,श्री संतोष सर,राजपूत सर ,श्री महाजन सर, सौ नाईक मॅडम ,पार्वती मॅडम व उपस्थित सर्व स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्थानिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री अशोक जगताप यांनी केले. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *