काव्यवाचन स्पर्धेत अमळनेर समाजकार्य महाविद्यालयाच्या कोळी सागर सुकदेव यांना द्वितीय क्रमांक…*
![]()
*काव्यवाचन स्पर्धेत अमळनेर समाजकार्य महाविद्यालयाच्या कोळी सागर सुकदेव यांना द्वितीय क्रमांक…*
*त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर जयंती महोत्सव*
*कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,* जळगाव येथील डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग व सामाजिक शास्त्रे प्रशाळा यांच्या वतीने आयोजित *त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर जयंती महोत्सव २०२६* निमित्त सामाजिकशास्त्रे प्रशाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा व गीतगायन स्पर्धा घेण्यात आल्या.
या कार्यक्रमात समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील विद्यार्थी कोळी सागर सुकदेव यांनी *काव्यवाचन स्पर्धेत* “त्यागमूर्ती माता रमाई” या विषयावर *स्वरचित कविता* सादर केली. त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे त्यांनी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात प्रा. डॉ. अनिल डोंगरे (अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) यांच्या हस्ते सागर यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये सातशे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. एस. टी. इंगळे (प्र-कुलगुरु, क.ब.चौ. उमवि, जळगाव), प्रा. डॉ. राकेश रामटेके (विभाग प्रमुख, डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समन्वयक
डॉ. विजय घोरपडे तसेच सहसमन्वयक डॉ. पोर्णिमा वाहाणे यांनी संयोजन केले.
विद्यार्थी सागर कोळी यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाकडून अभिनंदन करण्यात आले.

