डेडियापाडा येथे शिवदासशेठ खैरनार यांचे दुःखद निधन
1 min read

डेडियापाडा येथे शिवदासशेठ खैरनार यांचे दुःखद निधन

Loading

 डेडियापाडा येथे शिवदासशेठ खैरनार यांचे दुःखद निधन

डेडियापाडा (गुजरात) : येथील कै. नरेश शिवदास खैरनार व श्री. किशोर शिवदास खैरनार यांचे वडील कै. शिवदासशेठ नानाशेठ खैरनार यांचे आज दुपारी १ वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

स्वभावाने प्रेमळ, कुटुंबवत्सल आणि समाजात मानाचे स्थान असलेले शिवदासशेठ खैरनार यांच्या निधनाने खैरनार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे, मुली असा मोठा परिवार आहे. परिवाराचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.

कै. शिवदासशेठ खैरनार हे परिवर्धे येथील श्री. रतिलाल रामदास शिंपी यांचे व्याही होत तसेच कल्याण येथील डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या मोठ्या बहिणीचे सासरे होत.

त्यांचा अंत्यविधी उद्या रविवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डेडियापाडा येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.

परमेश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व खैरनार परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

चि. पंकज नरेश खैरनार – ९७२४६०३८३८
चि. भूषण नरेश खैरनार – ७५७५०२७८०५

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *