भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी मच्छिंद्र लांडगे यांची निवड
![]()
भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी मच्छिंद्र लांडगे यांची निवड
अमळनेर (प्रतिनिधी):
अमळनेर येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले मच्छिंद्र मनिलाल लांडगे यांची भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ रामकृष्ण भंगाळे यांनी जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारिणीत लांडगे यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
लांडगे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून संघटनात्मक कार्यात त्यांचा विशेष सहभाग राहिला आहे. पक्षनिष्ठा, कार्यकर्त्यांशी असलेला सुसंवाद आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांबाबतची त्यांची बांधिलकी लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे अमळनेर तालुक्यातील ओबीसी समाजाच्या प्रश्नांना अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. संघटन विस्तार, समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे व पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणे यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.
मच्छिंद्र लांडगे यांच्या निवडीबद्दल खासदार स्मिताताई वाघ तसेच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

