पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकारला महाविकास आघाडीचा घेराव; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी ,वांगचुक यांच्या उपोषणाला अमळनेर महाविकास आघाडीचा जाहीर पाठिंबा; पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध, प्रांताधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन
![]()
पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकारला महाविकास आघाडीचा घेराव; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
वांगचुक यांच्या उपोषणाला अमळनेर महाविकास आघाडीचा जाहीर पाठिंबा; पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध, प्रांताधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन
अमळनेर प्रतिनिधी
पेपर फुटीच्या घटना आणि परीक्षांमधील गैरव्यवहाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी श्री वांगचुक यांनी केलेल्या उपोषणाला अमळनेर तालुका महाविकास आघाडी ( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा) यांच्या वतीने सरकारच्या हुकूमशाही कृत्याचा निषेध करून महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार डॉ. बी एस पाटील यांच्या नेतृत्वाखाली मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर यांना निवेदन देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
अहिंसक पद्धतीने उपोषण करीत असलेल्या वांगचुक यांना जंतर-मंतर वरून पोलिसांनी गनिमी काव्याचा वापर करून बळजबरीने उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले हे कृत्य लोकशाहीला काळीमा फासणारे आहे. पेपर फुटी, शिक्षणावरील वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या भारताच्या भविष्याच्या दृष्टीने गंभीर मुद्दे आहेत परंतु सरकारला या मुद्द्यांचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नाही म्हणून या हुकूमशाही कृत्याच्या अंमळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करीत श्री वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करीत आहोत तरी आपण आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात अशा आशयाचे निवेदन प्रांत अधिकारी श्री मयूर भंगाळे यांना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉ बी एस पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी सभेत रूपांतर करून डॉ .बी एस पाटील, प्रा. अशोक पवार, संदीप घोरपडे, नरेंद्र ठाकूर, दर्शना पवार, बन्सीलाल भागवत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी धनगर दला पाटील, अरुण देशमुख, मनोहर नाना निकम, सुरेश दादा, गिरीश पाटील, प्रा. गणेश पवार, डॉ रवींद्र पाटील, वासुदेव मामा, मनोज पाटील, चिंधू वानखेडे, प्रताप पाटील, संतोष पाटील, नितीन निळे, चंद्रशेखर भावसार, मोहन भोई, देवेंद्र देशमुख, प्रकाश सोनवणे, शिवदास शेटे, डी वाय पाटील, गोकुळ बोरसे, अनंत निकम, कन्हेलाल कापडे, शरद नाना, सतीश देशमुख सर, मसूद पठाण, रोहिदास पाटील, सोमचंद संदनशिव, जाकीर शेख, ताराचंद सूर्यवंशी, मारुती पवार, व विद्यार्थी वर्ग, महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे तालुकाध्यक्ष डी एम पाटील व आभार प्रदर्शन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बी के सूर्यवंशी यांनी केले.

