तापी नदी माता जन्मोत्सव निमित्त साडी-चोडी अर्पण करून केले पूजन माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील यांनी व्यक्त केली कृतज्ञता
![]()
तापी नदी माता जन्मोत्सव निमित्त साडी-चोडी अर्पण करून केले पूजन
माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील यांनी व्यक्त केली कृतज्ञता
अमळनेर प्रतिनिधी:-पाडळसरे धरण येथे आई तापी नदी जन्मोत्सवानिमित्त माजी नगराध्यक्षा तथा माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांनी तापीमाईला साडी-चोळी अर्पण करून विधीवत पूजन केले.
या पावन प्रसंगी आई तापीच्या चरणी कृतज्ञतेची व श्रद्धेची भावना व्यक्त करत, अमळनेर मतदारसंघ सदैव सुजलाम, सुफलाम, समृद्ध आणि जलसंपन्न राहो, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद, भरभराट आणि सुख-समृद्धी नांदो,तसेच अमळनेर शहराची अखंडितपणे तृष्णातृप्ती होत राहो अशी मनोभावे प्रार्थना केली.तसेच आई तापीचे अखंड आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहोत आणि जलसमृद्धीच्या माध्यमातून विकासाचा प्रवाह अविरत वाहत राहो, हीच मंगलकामना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामिण व शहराचे पदाधिकारी,अमळनेर पालिकेचे नगरसेवक व नगरसेविका, जि प व प स चे माजी पदाधिकारी,सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्वानी यावेळी तापीमाईला फुले अर्पण करून पूजन केले.

