ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी ‘सायबर सुरक्षा’चे धडे,  साईकृपा इरिगेशन फॅक्टरीत इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीला उत्स्फूर्त प्रतिसाद
1 min read

ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी ‘सायबर सुरक्षा’चे धडे, साईकृपा इरिगेशन फॅक्टरीत इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी ‘सायबर सुरक्षा’चे धडे

साईकृपा इरिगेशन फॅक्टरीत इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीला उत्स्फूर्त प्रतिसाद

धरणगाव प्रतिनिधी : साईकृपा इरिगेशन फॅक्टरी, धरणगाव येथे बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.४० वाजता सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष इम्पॅक्ट सेशन व इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी आणि सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या सत्रात प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्डची सुरक्षितता, मजबूत पासवर्डचे महत्त्व तसेच द्विस्तरीय प्रमाणीकरण (2-Factor Authentication) याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक व क्यूआर कोडच्या माध्यमातून होणारे स्कॅम, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे आणि मोबाईल ॲप्स डाउनलोड करताना घ्यावयाची सुरक्षा काळजी याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

‘सावधानता हाच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा प्रभावी मार्ग’ या संदेशातून ऑनलाइन व्यवहार करताना कोणतीही वैयक्तिक अथवा बँकिंग माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि ओटीपी शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले.
संवादात्मक आणि प्रभावी पद्धतीने पार पडलेल्या या इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहभागींच्या विविध प्रश्नांना मार्गदर्शकांनी समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी उपस्थितांनी सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याचा व सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहण्याचा संकल्प केला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साईकृपा इरिगेशन फॅक्टरी, धरणगाव येथील उपस्थितांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *