शालेय स्पोर्ट्स डान्स क्रीडा स्पर्धांच्या निकालात गुणी विद्यार्थ्यांवर अन्याय*  *अकोला क्रिडा विभागाच्या पक्षपाताच्या चौकशीची पालकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.*  *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून चौकशीची मागणी
1 min read

शालेय स्पोर्ट्स डान्स क्रीडा स्पर्धांच्या निकालात गुणी विद्यार्थ्यांवर अन्याय* *अकोला क्रिडा विभागाच्या पक्षपाताच्या चौकशीची पालकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून चौकशीची मागणी

Loading

*शालेय स्पोर्ट्स डान्स क्रीडा स्पर्धांच्या निकालात गुणी विद्यार्थ्यांवर अन्याय*

*अकोला क्रिडा विभागाच्या पक्षपाताच्या चौकशीची पालकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.*

*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून चौकशीची मागणी*

*अकोला* — अकोला सांस्कृतिक चळवळीचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची आयोजनं केली जातात.त्यातून क्रिडापटू आणि कलाकारांना संधी देऊन प्रोत्साहन दिल्या जाते .परंतू आयोजन करणाऱ्या जिल्हा क्रिडा विभागातील परीक्षकांकडूनच कर्तव्याची बांधिलकी विसरून स्वतःच्या परिचयातील विद्यार्थ्यांना वशिलेबाजीने पुढे आणण्यात आले.यामुळे अग्रेसर ठरलेल्या मेहनती क्रिडापटू आणि कलाकारांवर अन्याय करण्याची संतापजनक घटना क्रिडा विभागाच्या स्पर्धांमध्ये घडली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय स्पोर्ट्स डान्स व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी स्पर्धकांना पक्षपाती निर्णयाला समोरे जावे लागले. त्यांच्या मेहनतीला जाणीवपूर्वक डावलून कर्तव्याची प्रतारणा करीत राष्ट्राच्या भावी आधारस्तंभावर आघात करून त्यांचे मनोबल खच्ची करण्याचे काम अकोला क्रिडा विभागाकडून झाले आहे.

या स्पर्धांविषयी सर्व शाळांना जाणीवपूर्वक माहिती देण्यात आली नव्हती. ज्या शाळा सहभागी झाल्या त्या स्पर्धकांच्या सादरीकरणानंतर ठराविक एकाच खाजगी शिकवण्यातील विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक देण्यात आलेत. या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय सादरीकरण करणाऱ्या मुलांच्या परिक्षणासाठी ह्या खाजगी शिक्षिकाच परीक्षक म्हणून होत्या. त्यामुळे त्यांनी आपल्या खाजगी शिकवण्यातील स्पर्धकांनाच प्रथम क्रमांक देऊन बाकी विद्यार्थ्यावर शिक्षकी पेशाला न शोभणारा अन्याय केलेला आहे.
याबाबतचे विभागीय स्तरावर त्वरीत निर्णय न देता संध्याकाळी निर्णय कळवू असे सांगण्यात आले होते. जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकच सहभागी करण्यात येतील असे सुध्दा जाहिर केले होते.परंतु पूर्व कल्पना न देता प्रत्यक्षात समोर आलेल्या यादीमध्ये शेवटच्या क्षणाला तृतीय क्रमांक असणाऱ्या विद्यार्थ्यांची नावं होती.जीव तोडून मेहनत करणाऱ्या स्पर्धक पाल्यांना मिळालेल्या या अमानविय वागणुकीमुळे पालकवर्ग संतप्त झालेला आहे.यामुळे अशा वशीलबाजीसाठी स्पर्धांमध्ये अग्रेसर विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक ठरलेले राज्यस्तरासाठी दिले गेलेले निर्णय स्पर्धक आणि पालक यांना मान्य नाहीत.

हा प्रकार क्रीडा विभागाच्या कर्तव्य,प्रामाणिकता आणि नि:पक्षपातीवर या खाजगी शिक्षिका मुळे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.या सर्व बाबींना लक्षात घेता या सबंध प्रक्रियेची चौकशी व्हावी.अत्यंत मनापासून आणि मेहनतीने योग्य सादरीकरण ज्यांनी केले,त्या मुलांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये यासाठी या गंभीर विषयाकडे प्राधान्याने आणि संवेदनशीलतेने लक्ष देऊन चौकशी व्हावी. राष्ट्राचे आधारस्तंभ म्हणविल्या जाणाऱ्या गुणी विद्यार्थांचे भविष्य अंध:कारमय करण्याचे षडयंत्र करणाऱ्यांवर कार्यवाही व्हावी.अशी मागणी संतप्त पालकांनी या निवेदनातून केलेली आहे.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने सुध्दा याबाबत चौकशी आणि कार्यवाहीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
=================================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *