आर सी पटेल आय. एम. आर. डी. परीसंस्थेत डिजिटल वेलनेस या विषयावर सत्र संपन्न
1 min read

आर सी पटेल आय. एम. आर. डी. परीसंस्थेत डिजिटल वेलनेस या विषयावर सत्र संपन्न

Loading

आर सी पटेल आय. एम. आर. डी. परीसंस्थेत डिजिटल वेलनेस या विषयावर सत्र संपन्न

शिरपूर प्रतिनिधी:
वेदांत माळी
गौरव पाटील
आर सी पटेल आय. एम. आर. डी. परीसंस्थेच्या विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत ‘डिजिटल वेलनेस’ या विषयावर दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सत्र आयोजित केले गेले. या सत्रासाठी मार्गदर्शक म्हणून नामांकीत आंतरराष्ट्रीय वक्ते आणि कॉर्पोरेट ट्रेनर श्री. ज्ञानेश्वर नेरकर उपस्थित होते. सर Certified Life Coach आणि NLP Practitioner म्हणुन कार्यरत आहेत. सत्रात विद्यार्थ्यांना आजच्या डिजिटल युगात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य राखण्याबाबत महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. अर्चना जडे यांनी केला. या प्रास्ताविकात ज्ञानेश्वर नेरकर सरांच्या डिजिटल वेलनेस आणि भावनिक बुद्धिमत्ता या क्षेत्रातील महत्वपूर्ण कामगिरीचा आढावा मांडला. कार्यक्रमाच्या सुरवातीला एमसीए व एमसीए (इंटिग्रेटेड) विभाग प्रमुख डॉ.मनोज बेहेरे यांनी श्री. ज्ञानेश्वर नेरकर यांचा सत्कार केला.

सत्राचे वक्ते श्री. ज्ञानेश्वर नेरकर यांनी या सत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता ( ARTIFICIAL INTELLEIGNCE ) याचा विद्यार्थ्यांनी कसा व किती वापर करावा या विषयावर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. आपल्या वैयक्तिक समस्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्म वर मांडल्याने होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली. तसेच आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्यरीत्या कसा वापर करता येईल याविषयी अतिशय सोप्या टिप्स देखील समजावून सांगितल्या. सोशल मीडियावरील रील्समुळे भावनांवर व एकाग्रतेवर होणाऱ्या प्रभावाचे स्पष्टीकरण दिले. सायबर सुरक्षेसोबतच वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात संतुलन कसे साधावे याबाबत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या सत्रात एकूण ३३६ पदवी व पद्व्यूत्तर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. अर्चना जडे यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले. सदर सत्र आयोजनाकरिता परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, एमसीए व एमसीए (इंटिग्रेटेड) विभाग प्रमुख डॉ.मनोज बेहेरे, आय.क्यु.ए.सी. समन्व्यक डॉ. मनोज पटेल व पदवी विभाग प्रमुख डॉ. तुषार पटेल यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. मनोजकुमार सोनवणे, सदस्य प्रा. सचिन सुराणा, प्रा. श्रेयस पाटील, प्रा. सुवर्णा चौधरी, प्रा. छाया पाटील, प्रा. सुचिता जाधव, प्रा. धनश्री पाटील, आणि प्रा. पूनम मंडलिक यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *