लोकवर्गणी, पाणीपट्टीवरील व्याज व प्रॉपर्टी कर रद्द करण्याची मागणी; ग्राहक पंचायतचे नगराध्यक्षांना निवेदन
![]()
लोकवर्गणी, पाणीपट्टीवरील व्याज व प्रॉपर्टी कर रद्द करण्याची मागणी; ग्राहक पंचायतचे नगराध्यक्षांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी -दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी अमळनेर नगर परिषदेचे नूतन अध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर साहेब यांचे सर्वप्रथम अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे अभिनंदन करण्यात आले .
अ.भा.ग्राहक पंचायतअमळनेर तर्फे त्यांना निवेदन देण्यात आले त्यात नमूद करण्यात आलेले आहे की अमळनेर नगरपरिषद गेल्या अनेक वर्षापासून लोक वर्गणीची नावाखाली मोठ्या प्रमाणात कर वसुली करीत आहे .सदर ही नागरिकांवर लादलेली कर वसुली अन्यायकारक व बळजबरीची आहे व ती का आकारली जात आहे त्याचे कोणतेही सबळ कारण नगरपरिषदेकडे नाही. आणि नगरपरिषद सन २०२४-२०२५ या वर्षापासून पाणीपट्टीच्या वार्षिक शुल्कात आर्थिक वर्ष ३१मार्च अखेर असताना ३१डिसेंबर पासूनच दोन टक्के दराने व्याज आकारित बळजबरीने नागरिकांकडून वसूल करीत आहे. नागरिकांमध्ये या बाबतीत तीव्र असंतोष आहे तरी आपण पाणीपट्टीवरील आकारण्यात येणारा व्याज(Water Cess) रद्द करावा .तसेच
प्रॉपर्टी खरेदी रकमेच्या दोन टक्के कर खरीदारांवर विनाकारण लावत आहे ते न्याय संगत नाही असे आम्हास वाटते. अगोदरच खरेदी करताना स्टॅम्प ड्युटी व इतर कर हे ग्राहकांकडून/ नागरिकांकडून सरकारद्वारे खरेदीचे वेळेस आकारले जात असतात . नगरपालिकेने फक्त नाव बदल करायचे आहेत त्यात कोणताही खर्च लागत नाही .तरी आपण हा कर का आकारत आहे त्याबद्दल स्पष्टीकरण नाही. नागरिकात याबद्दल असंतोष आहे तरी तो आपण त्वरित रद्द करावे असे निवेदनात सूचित करण्यात आले आहे.
दिनांक १७डिसेंबर २०२४ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांचे पदाधिकारी यांनी सदरचे निवेदन दिले असता ” पुढील काळात कर वसुली करताना लोक वर्गणी व त्यावर २ टक्के व्याज आकारणी करणार नाही ” असे आश्वासन दिले होते.तथापि आजतागायात लोक वर्गणी व पाणीपट्टीवर दोन टक्के व्याज आकारणी रद्द करणे बद्दल काहीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही म्हणून हे निवेदन आपणास देण्यात येत आहे.या निवेदनाची आपले स्तरावर योग्य ते आदेश व्हावेत अशी विनंती वजा सूचना करण्यात आलेली आहे .
याप्रसंगी स्वीकृत नगरसेवक प्रताप अण्णा साळी व नगरसेवक प्राध्यापक रामकृष्ण पाटील यांचेही अभिनंदन ग्राहक पंचायत तर्फे बुके देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले .
याप्रसंगी अखिल भारतीय ग्रामपंचायत तर्फे अध्यक्ष सौ स्मिता चंदात्रे एडवोकेट सौ भारती अग्रवाल, सौ कपिला मुठे सौ वनश्री अमृतकर ,सौ ज्योती भावसार, मकसूद बोहरी, विजय शुक्ल, सुनील वाघ सतीश देशमुख सर जयंतीलाल वानखेडे श्री व सौ रजनी पाटील आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी बातमी सौ मेहराज बोहरी कळवितात.


